कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेसमधून निलंबित आमदारावर बलात्काराचा गुन्हा

06:47 AM Nov 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गर्भपातासाठी भाग पाडल्याचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम

Advertisement

केरळच्या पलक्कडचे आमदार राहुल ममकूटाथिल विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. एका महिलेकडून त्यांच्या विरोधात लैंगिक शोषण आणि गर्भपातासाठी भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला होता. गुरुवारी रात्री उशिरा महिलेने नोंदविलेल्या जबाबाच्या आधारावर शुक्रवारी वलियामाला पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला. महिलेने मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना स्वत:च्या तक्रारीचे पत्र सोपविले होते. त्यानंतर तिरुअनंतपुरम ग्रामीण पोलीस मुख्यालयात महिला पोलीस अधिकाऱ्याकडून पीडितेचा विस्तृत जबाब नोंद करण्यात आला. र्लैंगिक शोषण, बळजबरीने गर्भपात करविणे, मारहाण करणे, अवैध स्वरुपात घरात घुसणे आणि गुन्हेगारी धमकीप्रकरणी आमदाराच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ममकूटाथिल यांचा मित्र जॉबी जोसेफ यालाही आरोपी करण्यात आले आहे. तिरुअनंतपुरम पोलीस आयुक्तांच्या देखरेखीत एक पथक याप्रकरणी तपास करेल.

आमदार पसार?

पीडितेकडून मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्यात आल्यावर ममकूटाथिल हे कथित स्वरुपात पसार झाले आहेत. आमदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

ध्वनिफित अन् चॅट आले समोर

यापूर्वी गुन्हे शाखेने एक ध्वनिफित आणि चॅट मेसेजच्या आधारावर गुन्हा नोंदविला होता. ही ध्वनिफित आणि चॅट पोलीस मुख्यालयाला काही लोकांकडून पाठविण्यात आलेल्या ईमेलमधून समोर आले होते. त्यावेळी महिला स्वत:हून समोर आली नव्हती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article