कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दांडेली बनावट नोटाप्रकरणी संशयित आरोपी ताब्यात

12:06 PM Apr 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कारवार : गांधीनगर-दांडेली येथील घरात आढळून आलेल्या बनावट नोटाप्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात दांडेली पोलिसांना यश आले आहे. संशयित आरोपीचे नाव अर्षद अंजुम खान (वय 36) असे असून त्याला उत्तरप्रदेशमधील लखनौ येथे ताब्यात घेण्यात आले आहे. खानला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. दांडेली येथे खळबळ उडवून दिलेल्या या प्रकरणाबद्दल अधिक माहिती अशी, गांधीनगर-दांडेली येथील नुरजहाँ झुंजवाडकर यांच्या घरी भाडेतत्त्वावर काही महिने वास्तव्य करून असलेला अर्षद खान भाडेतत्त्वावर राहताना गोव्याचा निवासी असे सांगितले होते. काही दिवसांपासून अचानक बेपत्ता झाला होता. तथापि, त्याने घराचा मागचा दरवाजा बंद केला नव्हता.

Advertisement

त्यावेळी पोलिसांनी घरात घुसून पाहणी केली असता 500 रुपये नोटांचे सुमारे 12 कोटी रुपये, पैसे मोजण्याची मशिन आणि अन्य साहित्य आढळून आले होते. इतक्या मोठ्या रकमेच्या बनावट नोटांमुळे जनतेत आणि पोलिसांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. दांडेलीचे गुन्हे अन्वेशन उपनिरीक्षक किरण पाटील व हल्ल्याळ गुन्हे अन्वेशन विभागाचे उपनिरीक्षक कृष्णा अरकेरीसह कर्मचाऱ्यांनी खान याचा मोबाईल व त्याच्या भूतकाळातील  व्यवहाराच्या आधारे तपास केला असता तो लखनौमध्ये असल्याचे दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच त्याने तेथून फरार होण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी तो पोलिसांच्या हाती लागला. त्याला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. कारवार जिल्हा पोलीसप्रमुख एम. नारायण, डीवायएसपी शिवानंद मदरखंडी, सीबीआय जयपाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article