कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

2.44 कोटींची फसवणूक करणाऱ्या संशयिताला अटक

07:30 AM Apr 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उच्च परताव्याचे आश्वासन देऊन फसविले होते

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

c याबाबत फोंडा येथील रहिवाशाने तक्रार दाखल केली होती. संशयिताच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 319(2) 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (ड) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयिताला गोव्यात आणून रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव नीरज राय (50, नरसिंहपूर मध्यप्रदेश) संशयिताने 25 नोव्हेंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 दरम्यान तक्रारदाराला फेसबुक आणि व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला. आपण शेअर बाजारातील व्यापारतज्ञ असल्याचे भासवू उच्च परताव्याचे आश्वासन देऊन बनावट ऑनलाइन शेअर बाजार योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले आणि अशा प्रकारे अनेक बँक व्यवहारांद्वारे त्याची 2 कोटी 44 लाख 59 हजार ,408 रुपयांची फसवणूक केली होती.

तपास आणि आर्थिक विश्लेषणाच्या आधारे, पोलिसांना एका संशयिताची ओळख पटली. सायबर गुन्हा विभाग पोलिस स्थानकाचे निरीक्षक दीपक पेडणेकर आणि अधीक्षक राहुल गुप्ता (आयपीसी) यांच्या देखरेखीखाली, उपनिरीक्षक मंदार गावकर, कॉन्स्टेबल आशिष नाईक आणि शांताराम नर्से यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिस पथकाने नरसिंहपूर मध्यप्रदेश येथे जाऊन संशयिताला अटक केली.

चौकशीदरम्यान असे उघड झाले की, संशयिताची मोठ्या बँकामध्ये अनेक खाती असून फसवणुकीच्या रकमेपैकी 3 लाख ऊपये विविध खात्यांमध्ये वळविले होते. त्याचे बँक खाते देशभरातील इतर 40 प्रकरणांमध्ये देखील सहभागी असल्याचे आढळून आले आहे. निरीक्षक दीपक पेडणेकर पुढील तपास करीत आहेत.

 

 

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article