सूर्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा
सूर्या या दाक्षिणात्य अभिनेत्याच्या 45 व्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. या चित्रपटाचे नाव ‘करुप्पु’ आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचे पोस्टर जारी केले आहे. या पोस्टरवर एक घोडेस्वार दिसून येत आहे, तर मधल्या भागात एक इसम उभा असून त्याच्या हातात एक घातक अस्त्र असल्याचे दिसून येत आहे.
सूर्या यापूर्वी ‘रेट्रो’ या चित्रपटात दिसून आला होता. हा चित्रपट फारसा चालला नव्हता. तर त्याच्या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन आर.जे. बालाजी करत आहे. ‘करुप्पु’ या चित्रपटात तृषा कृष्णन मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ड्रीम वॉरियर पिक्चर्सकडून केली जात आहे. चित्रपटाला साई अभ्यंकर यांचे संगीत लाभणार आहे.
निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर करत पॅप्शनदाखल ‘गर्व आणि उत्साहासोबत आम्ही सुर्याच्या 45 व्या चित्रपटाचे नाव जाहीर करत आहेत. करुप्पू हे नाव आमच्या कहाणीचा गाभा दर्शविणार आहे. या कहाणीला हृदय, भावना आणि उद्देशाने आकार देण्यात आला’ असल्याचे म्हटले गेले आहे.