सूर्यकुमारला पहिला सामना हुकणार
06:27 AM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
Advertisement
भारतीय संघातील अक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव याला अलिकडेच हाताला दुखापत झाली होती. ही दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने 5 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यात तो खेळू शकणार नाही.
दुलीप करंडक स्पर्धेतील 5 सप्टेंबर रोजी भारत क आणि भारत ड यांच्यात सामना होणार आहे. त्याच प्रमाणे भारत अ आणि भारत ब यांच्यातील सामना 5 सप्टेंबर रोजी बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविला जाईल.
Advertisement
Advertisement