सुमित नागलची डेव्हिस लढतीतून माघार
06:25 AM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
Advertisement
2024 च्या टेनिस हंगामातील येथे यजमान भारत आणि स्विडन यांच्यात डेव्हिस चषक स्पर्धेतील लढत 14-15 सप्टेंबर रोजी होणार आहे. भारताचा अव्वल टेनिसपटू सुमित नागलने पाठदुखापतीच्या समस्येमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
सध्या सुरू असलेल्या अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात नागलला या दुखापती समस्येमुळे माघार घ्यावी लागली. भारतीय डेव्हिस चषक संघाचे माजी राष्ट्रीय विजेता आशुतोष सिंग नवे प्रशिक्षक आहेत. सुमित नागल एटीपीच्या मानांकनात 82 व्या स्थानावर आहे.
Advertisement
Advertisement