महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सुर्याने अव्वलस्थान गमावले, ट्रेव्हिस हेड नंबर 1!

06:12 AM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयसीसी टी 20 क्रमवारी : रोहितचीही झेप

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्याआधी आयसीसीकडून फलंदाजी क्रमवारी जारी करण्यात आली आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज  सूर्यकुमार यादवला मोठा धक्का बसल असून त्याला आपले अव्वलस्थान गमवावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज ट्रेव्हिस हेड आता टी 20 मधील अव्वल फलंदाज ठरल आहे. सूर्यकुमारची एका क्रमाने घसरण झाली असून तो आता दुसऱ्या स्थानी आहे.

कांगारुंच्या या स्फोटक फलंदाजाने चार स्थानानी झेप घेत पहिले स्थान पटकावले आहे. हेडचे 844 गुण आहेत. भारताचा सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. सूर्याचे रेटिंग सध्या 842 गुण आहे. पहिला आणि दुसरा फलंदाज यांच्यात फक्त दोन रेटिंग गुणांचा फरक आहे. यामुळे सुर्याला पुन्हा अव्वलस्थान पटकावण्याची नामी संधी आहे. इंग्लंडचा फिल सॉल्ट तिसऱ्या, पाकिस्तानचा बाबर आझम चौथ्या तर पाकचा मोहम्मद रिझवान पाचव्या स्थानी आहे. टीम इंडियाचा युवा यशस्वी जैस्वाल सातव्या स्थानावर कायम आहे, यंदाच्या विश्वचषकात त्याला आतापर्यंत खेळण्याची संधी मिळालेली नाही. तरीही त्याने आपले स्थान कायम राखले आहे.

रोहितचीही झेप

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20 विश्वचषकात वादळी फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्माला आयसीसी क्रमवारीत चांगलाच फायदा झाला आहे. कर्णधाररोहित शर्मा आता 38 व्या क्रमांकावर पोहचलाय. रोहित शर्माचे 527 रेटिंग गुण आहेत. याशिवाय, विराट कोहलीलाही क्रमवारीत फायदा झाला आहे. विराट 50 व्या क्रमांकावरुन 47 व्या क्रमांकावर पोहचला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article