आयसीसी टी 20 संघाचे नेतृत्व सूर्याकडे
अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल व रवि बिश्नोई यांनाही स्थान
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने 2023 चा सर्वोत्कृष्ट टी 20 संघ जाहीर केला आहे. भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. सूर्याशिवाय इतर तीन भारतीय खेळाडूंना वर्षातील सर्वोत्तम संघात स्थान मिळाले आहे. आयसीसीच्या संघात सूर्यकुमार व्यतिरिक्त यशस्वी जैस्वाल, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांचा समावेश आहे.
आयसीसीच्या या संघात भारताचे चार, झिम्बाब्वेचे दोन, इंग्लंडचा एक, वेस्ट इंडिजचा एक, आयर्लंडचा एक आणि न्यूझीलंडचा एक खेळाडू आहे. विशेष म्हणजे आयसीसीने या सर्वोत्कृष्ट टी 20 संघात युगांडाच्या एका खेळाडूची देखील निवड केली आहे. मात्र पाकच्या एकाही खेळाडूल या संघात स्थान मिळवता आलेले नाही. फलंदाजीच्या क्रमवारीत सर्वोच्च स्थानावर सूर्यकुमार आणि यशस्वी या भारतीय जोडीला पहिली पसंती होती, तर इंग्लंडचा फिल सॉल्ट तिसऱ्या क्रमांकावर आला. वेस्ट इंडिजच्या निकोल्स पूरनला आयसीसी संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंडचा मार्क चॅपमन, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, युगांडाचा अल्पेश रमजानी, आयर्लंडचा मार्क अडायर हे संघात आहेत. भारताचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईही या संघात आपली जागा निश्चित करण्यात यशस्वी ठरला आहे. या संघात झिम्बाब्वेचा रिचर्ड नगारावा आणि भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना देखील संधी देण्यात आली आहे. दरम्यान, संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे देण्यात आले आहे. टी 20 क्रिकेटमध्ये अलीकडील काळात सूर्याची कामगिरी शानदार झाली आहे, याचाच फायदा त्याला झाला आहे.
#sports#spor#
यशस्वी जैस्वाल, फिल सॉल्ट, निकोल्स पूरन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), मार्क चॅपमन, सिकंदर रझा, अल्पेश रमजानी, मार्क अडयर, रवी बिश्नोई, रिचर्ड नगारवा, अर्शदीप सिंग