For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लाच स्वीकारताना सर्व्हेयरला रंगेहाथ अटक

06:58 AM Jul 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
लाच स्वीकारताना सर्व्हेयरला रंगेहाथ अटक
Advertisement

हुक्केरी भूमापन कार्यालयात लोकायुक्तची कारवाई : लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

पाच गुंठे जमिनीचा 11 ई नकाशा करून देण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच स्वीकारताना हुक्केरी येथील भूमापन खात्याच्या सर्व्हेयरला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी शनिवारी रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईने सरकारी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. बाड (ता. हुक्केरी) येथील प्रकाश यमनाप्पा मैलाके यांच्या मालकीच्या 30 गुंठे जमिनीपैकी मुलगा प्रवीण मैलाके यांना 5 गुंठे जमिनीचा 11 ई नकाशा करून देण्यासाठी हुक्केरी येथील भूमापन खात्याच्या साहाय्यक संचालकांच्या कार्यालयात त्यांनी अर्ज दिला होता. सर्व्हेयरने यासाठी 3 हजार रुपये लाच मागितली होती.

Advertisement

शुक्रवार दि. 4 जुलै रोजी प्रकाश मैलाके यांनी लोकायुक्त पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. शनिवारी बसवराज बाळाप्पा कडलगी, राहणार यमकनमर्डी या सर्व्हेयरला 3 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लोकायुक्त पोलीस अधीक्षक हणमंतराय यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

लोकायुक्त विभागाचे पोलीस उपअधीक्षक पुष्पलता एन., पोलीस निरीक्षक व्यंकटेश यडहळ्ळी, रवी मावरकर, संतोष बेडग, अभिजित जमखंडी, शशी देवरमनी, बसवराज कोडहळ्ळी, एल. एस. होसमनी, बसवराज कत्ती, अनिल हंडुरी आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. सर्व्हेयर बसवराज कडलगीवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.