For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नूतन जिल्हाधिकारी कार्यालयासाठी इमारतीसह झाडांचेही सर्वेक्षण

10:26 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
नूतन जिल्हाधिकारी कार्यालयासाठी इमारतीसह झाडांचेही सर्वेक्षण
Advertisement

दोन एकर जमीन संपादीत :100 कोटीचा निधी मंजूर

Advertisement

बेळगाव : नूतन जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पुढाकार घेण्यात आला आहे. यासाठी 100 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून, यासाठी दोन एकर जमीन संपादीत केली जाणार आहे. त्यानुसार या भागातील अनेक इमारती जमीनदोस्त केल्या जाणार असून त्याचा सर्व्हेक्षण करण्यात आला आहे. याबरोबरच या भागातील झाडांचे सर्वेक्षणही करण्यात आले आहे. त्यामुळे येथील अनेक झाडांवर कुऱ्हाड येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामधील दोन एकर जमिनीमध्ये नवीन जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 100 कोटीचा निधी मंजूर केला असून जमिनीचा दर्जा तपासला आहे. या भागात असणाऱ्या इमारतींसह झाडांचाही सर्वेक्षण केला आहे. त्यामुळे या भागातील नेमक्या किती झाडांवर कुऱ्हाड येणार आहे.

हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र येथील अनेक इमारती जमीनदोस्त केल्या जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून या भागातील जमीन संपादनासाठी आवश्यक असणारा सर्वेक्षण केला आहे. भू-सर्वेक्षणासह ड्रोनच्या माध्यमातूनही सर्वेक्षण करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून येथील कार्यालयांची माहिती घेण्यात आली आहे. याबरोबरच या परिसरात असणाऱ्या वृक्षांचीही माहिती घेतली आहे. बागायत खात्याच्या आवारात अनेक झाडे असून त्यांची माहिती घेण्यात आली आहे. मात्र अद्याप नंबर घालून सर्वेक्षण करण्यात आले नसल्याचे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. नंबर घालण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच झाडे हटविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र वृक्षसंपदा वाचविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील. असेही बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.