महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शेतकऱ्यांवर दडपशाही करत बुडाकडून सर्व्हे

11:11 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कणबर्गी येथील शेतकऱ्यांनी पुन्हा जमीन देण्यास केला विरोध

Advertisement

बेळगाव : कणबर्गी येथील शेतकऱ्यांनी बुडाला जमीन देण्यास विरोध केला आहे. न्यायालयातून शेतकऱ्यांनी स्थगिती घेतली आहे. तरीदेखील बुडाने दडपशाही करत या जागेचा मंगळवारी सर्व्हे केला आहे. यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत असून पुन्हा न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे शेतकरी बबन मालाई यांनी सांगितले. कणबर्गी येथील शेतकऱ्यांची जमीन घेऊन या ठिकाणी स्कीम क्रमांक 61 राबविण्यासाठी बुडा प्रयत्न करत आहे. या जागेमध्ये अनेकांनी घरेही बांधली आहेत. तर काही रिअल इस्टेटधारकांनी शेतकऱ्यांना भीती दाखवून त्यांच्या जमिनी घेतल्या आहेत. खरेदी-विक्रीही झाली आहे. असे असताना बुडा अचानकपणे सर्व्हे करत आहे. 25 एकरमधील शेतकऱ्यांनी न्यायालयातून स्थगिती घेतली आहे. त्या स्थगितीबाबतचा आदेश शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे दिला. यावेळी आम्ही तुमची जमीन सोडून सर्व्हे करत असल्याचे सांगितले. बुडा ही जमीन घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र अनेकांनी त्याला विरोध केला आहे. विरोध झाल्यानंतर काही वर्षे हे काम थांबले होते. मात्र पुन्हा या ठिकाणी ही स्कीम राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये काही रिअल इस्टेटधारकही सामील आहेत, असा आरोप शेतकरी करत आहेत. बुडाने जमीन कब्जात घेतल्यानंतर त्याची खरेदी-विक्री कशी होते? असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. मंगळवारी शेतकऱ्यांनी सर्व्हे कार्यालयात जावून सर्व्हे करण्यास आपला विरोध असल्याचा अर्ज दिला. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. एक प्रकारे हा न्यायालयाचा अवमान असून त्याविरोधात लढाई लढणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Advertisement

शेतकऱ्यांनी खांब हटविले

शेतकऱ्यांनी न्यायालयातून स्थगिती घेतली असताना बुडाने त्यांच्या हद्दीमध्ये खांब उभे केले. मात्र शेतकऱ्यांनी ते खांब काढून टाकले. यापुढे आमच्या जागेमध्ये जर तुम्ही खांब रोवला तर शांत राहणार नाही, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

निविदा नसतानाच काम

या कामासाठी कोणत्याही प्रकारची निविदा मागविण्यात आलेली नाही. निविदा नसतानाच हे काम सुरू करण्यात आल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे जे काम सुरू आहे ते बेकायदेशीर असून तातडीने थांबवावे, अशी मागणी  शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत बुडा आयुक्तांना काही शेतकऱ्यांनी निवेदनही दिले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article