सुरुचीला नेमबाजीत चार सुवर्ण पदके
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशीप स्पर्धेत शनिवारी हरियाणाची नेमबाज सुरुचीने चौथे सुवर्णपदक मिळविले. महिलांच्या एअर पिस्तुल नेमबाजी प्रकारात सुरुचीने हे यश संपादन केले. या स्पर्धेत भारताची दुहेरी ऑलिम्पिक कास्यपदक विजेती नेमबाज मनु भाकरने महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत 243.1 गुण नोंदवित वरिष्ठ गटात राष्ट्रीय विजेतपद मिळविले.
हरियाणाच्या सुरुचीने महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजी वैयक्तिक प्रकारात आपले पूर्ण वर्चस्व राखले. तसेच तिने महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक युवा गटात उत्तराखंडच्या यशस्वी जोशी समवेत 16-2 असे गुण नोंदवित सुवर्णपदक मिळविले. या स्पर्धेतील चौथे सुवर्णपदक आहे. या क्रीडा प्रकारात कर्नाटकाच्या जोनाथ्न अॅन्टोनी आणि अवांतिका मधू यांनी रौप्य पदक तर जस्वीरसिंग सहानी आणि सायना भरवाणी यांनी कास्यपदक मिळविले.