सुरूची, सौरभ नेमबाजी स्पर्धेत विजेते
वृत्तसंस्था / डेहराडून
येथे सोमवारी झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेत सुरूची इंदरसिंग आणि सौरभ चौधरी यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुषांच्या 10 मी. पिस्तुल नेमबाजीत पहिले स्थान पटकाविले.
महिलांच्या 10 मी. पिस्तुल नेमबाजीत अ गटातून सुरूची इंदरसिंगने 588 गुण पात्र फेरी अखेर नोंदवित आघाडी घेतली होती. त्यानंतर अंतिम फेरीत तिने 244.3 गुणासह पहिले स्थान पटकाविताना अंजली शेखावतला 3.1 गुणांनी मागे टाकले. अंजलीने या क्रीडा प्रकारात दुसरे तर अनुभवी राही सरनोबतने 221.6 गुणासह तिसरे स्थान घेतले. भारताच्या ऑलिम्पिक महिला नेमबाज मनु भाकर आणि इशा सिंग यांना या क्रीडा प्रकारात अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या 10 मी. पिस्तुल नेमबाजीमध्ये सौरभ चौधरीने 245.7 गुणासह पहिले स्थान घेतले. सुभाष सिहागने 245.3 गुणासह दुसरे तर आदित्य मलराने 223.5 गुणासह तिसरे स्थान मिळविले. सम्राट राणाला चौथ्या तर उज्वल मलिकला पाचवे स्थान मिळाले.