महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुर्ला ग्रामसभा विविध प्रश्नांमुळे गाजली

11:41 AM Jan 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

धोकादायक झाडे, मोकाट गुरे, जंगलाना आग लावण्याचे प्रकार, कचरा विषयांवर गरमागरम चर्चा

Advertisement

सांखळी : सुर्ल पंचायतीची ग्रामसभा रविवारी पंचायत सभागृहात सरपंच विश्र्रांती सुर्लकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गावातील विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी सरपंच विश्र्रांती सुर्लकर, उपसरपंच भोला खोडगिणकर, पंच सुभाष फोंडेकर, दिनेश मडकईकर, शाणू सुर्लकर, साहिमा गावडे यांची उपस्थिती होती, या सभेत गावातील घरांना धोकादायक ठरणारी झाडे, जंगलाना आग लावण्याचे प्रकार,भटकी गुरे, शेतकऱ्यांचे प्रŽ, सरकारी मालमत्तेचे नुकसान, कचरा गोळा करणे,  आदी विविध विषयावर चर्चा झाली.

Advertisement

मोकाट गुरांमुळे शेती-बागायतींचे नुकसान

उन्हाळ्यात गावातील खुल्या जागेत अज्ञात व्यक्तींकडून आग लावण्याचे प्रकार केले जातात. त्यामुळे गुरांना चारा मिळणे कठीण होत असल्याने मोकाट गुरे परसात, कुळागरात शिरकाव करून शेतकऱ्यांचे नुकसान करत असल्याचे नागरिक सुरेश बायेकर यांनी ग्रामसभेत निदर्शनास आणून दिले.  यावर चर्चा करून गुरांच्या मालकांकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली. पंचायत क्षेत्रातील धोकादायक झाडांचा प्रश्नावर चर्चा झाली. ही झाडे कापून कोण हटवावी, असा प्रश्न उपस्थित झाला. याबाबत कार्यालयात पाठवून त्यांच्याकडून  मार्गदर्शन घ्यावे लागेल, असे मत उपसरपंच भोला खोडगिणकर यांनी व्यक्त केले,

पंचायत क्षेत्रात कोणी सरकारी मालमत्तेचे नुकसान करत असेल तसेच  बेकायदा वृक्षतोड होत असेलतर त्या विरोधात तक्रार करावी, याची सरकारी अधिकाऱ्यांनी दखल घेऊन पहाणी करावी व दोषींवर कारवाई कारण्याची मागणी जि. पं. सदस्य गोपाळ सुर्लकर यांनी यावेळी केली. बाबलो नाटेकर,महेंद्र शिरोडकर,आपा भामईकर प्रकाश फोंडेकर,जानू सांतोडकर,दत्ता सातोडकरआदींची चर्चेत सहभाग घेतला. सचिव महादेव नाईक यानी मागील सभेचा अहवाल सादर केला  सरपंच विश्र्रांती सुर्लकर यांनी स्वागत केले, सहिमा गावडे यांनी आभार मानले, डिचोली गटविकास कार्यालयातर्फ शारदा गवंडे या निरीक्षक म्हणून उपस्थित होत्या. यावेळी माजी पंचायत सदस्य स्व प्रशांत गावकर यांच्या अपघाती निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून त्यांना श्र्रद्धांजली वाहण्यात आली,

प्रत्येक ग्रामसभेत घातला जातो गोंधळ  :सरपच

पंचायत मंडळ गावाच्या सर्वांगीण विकासाठी कार्यरत आहे. गावातील समस्या सोडवायच्या आहेत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचेही चांगले सहकार्य मिळत आहे तरीही काही लोक जाणून बुजून समस्या निर्माण करून ग्रामसभेत येऊन गोंधळ घालतात. अशांना पंचायत मंडळ व सरपंच योग्य उत्तरे देतातच मात्र अशा गोंधळामुळे सामान्य नागरिकांचे प्रŽ राहून जातात. यामुळे ग्रामसभेत गोंधळ न घालता ग्रामसभेत विकास कामांवर चर्चा करून सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच विश्र्रांती सुर्लकर यांनी केले.

 शेतकरी संजय पाटील यांचे अभिनंदन

सावईवेरेचे सुपुत्र सेंद्रीय पद्धतीने शेती-बागायती करणारे व युवकांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करणारे शेतकरी संजय पाटील यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाल्याने सुर्ल पंचायत मंडळ व सुर्ल विभागातील शेतकरी, ग्रामस्थांच्या वतीने  अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article