बार्बी होण्यासाठी करविली शस्त्रक्रिया
ओठांचा आकार झाला विचित्र
जगात सौंदर्याची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. परंतु सौंदर्य प्राप्त करण्याचा ध्यास काही लोकांना कुठलेही पाऊल उचलण्यास भाग पाडतो. ऑस्ट्रियाच्या ओन्लीफॅन्स मॉडेल ‘फेटिश बार्बी’ची हीच स्थिती आहे. तिने स्वत:ला बार्बी डॉलसारखे करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.
30 वर्षीय फेटिश बार्बीने स्वत:च्या सौंदर्याला बार्बी डॉलसारखे करण्यासाठी आतायर्पंत 53 लाख रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली आहे. वयाच्या 18 व्या वर्षी तिने कॉस्मेटिक ट्रीटमेंट्सची सुरुवात केली आणि तेव्हापासून आतापर्यंत बोटोक्स आणि फिलर्सद्वारे स्वत:च्या लुकला तिने पूर्णपणे बदलले आहे. आता तिच्या ओठांचा आकार बदलला असून गाल अन् सुरकुत्यांपासून मुक्त चेहऱ्यामुळे ती आता बार्बी डॉलप्रमाणे दिसण्यास मदत होते.
माझ्या परिवाराला आणि मित्रांना वाढत्या शस्त्रक्रियांबद्दल मोठी चिंता वाटते. परंतु तरीही मला माझा ‘इन्फ्लेटेड’ लुक पसंत असून मी तो कधीच बदलणार नाही. माझे लक्ष्य डॉल-लाइक अपीयरेन्स मिळविणे असून ज्यात मोठ्या आकाराचे ओठ, लांब केस आणि पॉलिश केलेली नखं सामील आहेत. टये लुक मला सशक्त आणि आत्मविश्वासाची अनुभव करून देतो. लोकांनी काहीही म्हटले तरीही मी जशी आहे तशीच राहणे मला पसंत आहे. आता मी पूर्वीपासून अधिक सुंदर दिसते असे फेटिश बार्बी सांगते.
तज्ञांचा इशारा
बोटोक्स आणि फिलर्सचा अत्याधिक वापर आरोग्यावर गंभीर प्रभाव पाडू शकतो. या शस्त्रक्रियेमुळे शारीरिक समस्यांसोबत मानसिक तणावही होऊ शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे. फेटिश बार्बीचा अनोखा लुक आणि तिचे बार्बी डॉलसारखे दिसण्याचा ध्यास सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. काही लोक तिचे कौतुक करत आहेत, तर काही जण याला शस्त्रक्रियेचे वेड ठरवत आहेत.