‘बार्बी नोज’साठी करविली शस्त्रक्रिया
बदलला महिलेचा चेहरा
इस्तंबुलच्या रस्त्यांवर आता केवळ पर्यटक नाही तर ‘बार्बी नोज’चे स्वप्न घेऊन येणारे लोकही दिसू लागले आहेत. ही शस्त्रक्रिया आता ग्लोबल प्लास्टिक सर्जरीचा सर्वात हॉट ट्रेंड ठरली आहे. न्यूयॉर्क येथे राहणारी 25 वर्षीय अलेक्झेंड्रीया लिंटनने तुर्कियेतील प्रसिद्ध सर्जन डॉक्टर एरडी ओजडेमिर यांच्याकडून ही शस्त्रक्रिया करविली असून अता ती स्वत:ची ट्रान्सफॉर्मेशनल जर्नी शेअर करत आहे.
काय आहे बार्बी नोज?
हे नाकाचे एक खास ट्रान्सफॉर्मेशन असून ज्यात नाक कमी रुंद, सरळ आणि काहीसे वर उचलल्यासारखे दिसते. हे अत्यंत बार्बी डॉलच्या नाकासारखे असते. अशाप्रकारचे नाक मिळविण्यासाठी नाकाच्या त्वचेला हाड आणि कार्टिलेजवरून उचलत शेप दिला जातो असे न्यूयॉर्कमील प्रसिद्ध डॉक्टर एरी होशेंडर यांनी सांगितले आहे.
अलेक्झेंड्रीयाचा अनुभव
ही शस्त्रक्रिया करवून घेण्याचे स्वप्न मी मागील 6 वर्षांपासून पाहिले होते आणि अखेर ते पूर्ण झाले आहे. स्वत:ला आत्मविश्वास आणि आनंद वाटेल असे कृत्य प्रत्येकाने करावे असे माझे मानणे आहे. शस्त्रक्रियेबद्दल टाळाटाळ करू नये असे अलेक्झेंड्रीयाने सांगितले आहे.
बार्बी नोजचा ट्रेंड
अमेरिकेत हॅशटॅग बार्बी नोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे आणि लोक या शस्त्रक्रियेद्वारे बार्बी नोज आकार मिळवू पाहत आहेत. परंतु काही टीकाकार याला सोशल मीडियाचा दबाव मानतात आणि महिलांवर हा प्रकार अनैसर्गिक सौंदर्याचे मापदंड लादत असल्याचे सांगत आहेत. शस्त्रक्रिया हा माझा वैयक्तिक निर्णय होता आणि त्याबाबत मी पूर्णपणे आनंदी असल्याचे अलेक्झेंड्रीयाचे सांगणे आहे.
स्वस्त शस्त्रक्रियेसाठी तुर्कियेची निवड
अलेक्झेंड्रीया ही एका ब्युटी सर्जरी ग्रूपची रिजनल बिझनेस मॅनेजर आहे. तिने स्वत:ची शस्त्रक्रिया तुर्कियेतील डॉक्टर एरडी ओजडेमिर यांच्याकडून करविली आहे. न्यूयॉर्कमध्ये या शस्त्रक्रियेसाठी 30 हजार डॉलर्सचा खर्च येऊ शकतो. तर तुर्कियेमध्ये ही शस्त्रक्रिया तिने केवळ 4100 डॉलर्समध्ये करविली आहे. डॉक्टर ओजडेमिर यांचा ‘बार्बी नोज’ ट्रान्सफॉर्मेशन इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला असून त्याला लाखो ह्यूज मिळाल्या आहेत.