महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॉनवेच्या दुखापतीवर लवकरच शस्त्रक्रिया

06:30 AM Mar 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन

Advertisement

न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज देवॉन कॉनवेच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली असल्याने या दुखापतीवर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या दुखापतीमुळे तो 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळू शकणार नाही. कॉनवे हा चेन्नई सुपर किंग्जचा प्रमुख फलंदाज आहे.

Advertisement

ऑकलंडमध्ये 23 फेब्रुवारी रोजी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात खेळताना कॉनवेच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला ही दुखापत झाली होती. 32 वर्षीय कॉनवेच्या या दुखापतीवर येत्या आठवड्यामध्ये शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर या दुखापतीतून पूर्ण बरे होण्यासाठी त्याला किमान आठ आठवड्यांचा कालावधी लागेल. कॉनवेच्या या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्जच्या फ्रांचाईजीला मोठा धक्का बसला आहे. 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विद्यमान विजेता चेन्नई सुपर किंग्जचा सलामीचा सामना आरसीबी बरोबर चेन्नईत होणार आहे. 2022 च्या आयपीएल हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जने कॉनवेला 1 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले होते. त्याने या आयपीएल हंगामात 23 सामन्यातून 924 धावा जमविल्या होत्या. 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक सध्या जाहिर करण्यात आले आहे. भारतामध्ये एप्रिल-मे दरम्यान लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने निवडणुकीच्या वेळापत्रकानंतरच आयपीएलाच्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहिर केले जाईल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article