कोमसाप मालवणच्या अध्यक्षपदी सुरेश ठाकूर
जिल्हा प्रतिनिधी म्हणून मालवणी कवी रुजारियो पिंटो यांची फेरनिवड
आचरा प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरेश ठाकूर अध्यक्ष कोमसाप मालवण यांच्या अध्यक्षतेखाली आचरे येथे संपन्न झाली. यात सन २०२५ ते २०२८ या कालावधीसाठी नूतन कार्यकारणी निवडण्यात आली. तसेच साहित्यिक उपक्रमांसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या. यावेळी कोमसाप मालवणच्या अध्यक्षपदी सुरेश ठाकूर तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून मालवणी कवी रुजारियो पिंटो यांची फेरनिवड करण्यात आली.सभेच्या सुरुवातीला ज्येष्ठ साहित्यिक तथा वैज्ञानिक जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर महाराष्ट्र गीताने सभेला सुरुवात करण्यात आली. या सभेसाठी तालुक्यातील विविध भागातील सुमारे ३९ कोमसाप सदस्य उपस्थित होते. यावेळी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्ष सुरेश ठाकूर, उपाध्यक्ष गुरुनाथ ताम्हणकर, जिल्हा प्रतिनिधी रुजारियो पिंटो, कार्यवाह अनिरुद्ध आचरेकर, कोषाध्यक्ष पांडुरंग कोचरेकर कार्यकारणी सदस्य - जेरॉन फर्नांडिस, सदानंद कांबळी, प्रकाश पेडणेकर, एकनाथ गायकवाड, रामचंद्र कुबल, श्रुती गोगटे यांची निवड झाली. साहित्यिक उपक्रमांच्या आयोजनासाठी पुढील प्रमाणे विविध समित्या गठीत करण्यात आल्या- सल्लागार समिती - बाबाजी भिसळे, लक्ष्मण आचरेकर, रामचंद्र आंगणे, सुरेंद्र सकपाळ, माधव गावकर, सुगंधा गुरव, ज्येष्ठ नागरिक विभाग समिती - अशोक कांबळी, मनाली फाटक युवाशक्ती कोमसाप - भावना मुणगेकर, कामिनी ढेकणे, शालेय विभाग समिती- अनघा कदम, गोविंद प्रभू, महिला विभाग समिती- मधुरा माणगावकर, वर्षा सांबारी, शिक्षक उपक्रम विभाग - सायली परब, तेजल ताम्हणकर, स्पर्धा व उपक्रम विभाग - रमाकांत गोविंद शेट्ये, महादेव बागडे यांची निवड झाली.यावेळी बोलतो मराठी या स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक - विनय वझे, द्वितीय क्रमांक - मंदार सांबारी, तृतीय क्रमांक - रामचंद्र कुबल यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.