मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी सुरेश कैत
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे 28 वे मुख्य न्यायाधीश म्हणून सुरेश कुमार केत यांनी बुधवारी शपथ घेतली आहे. राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी राजभवनात आयोजित सोहळ्यात त्यांना शपथ दिली आहे. यादरम्यान मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि अन्य मंत्री उपस्थित होते. 21 सप्टेंबर रोजी न्यायाधीश सुरेश कुमार कैत यांना मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले होते. हे पद 24 मे 2024 पासून रिक्त होते.
न्यायाधीश सुरेश कुमार कैत हे हरियाणाच्या कैथल जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून कायद्याची पदवी मिळविली होती. 5 सप्टेंबर 2008 रोजी कैत हे दिल्लीचे उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश झाले होते. यानंतर 12 एप्रिल 2013 रोजी स्थायी न्यायाधीश म्हणून ते नियुक्त झाले होते. न्यायाधीश कैत यांनी हैदराबाद येथील तेलंगणा आणि आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात सेवा बजावली होती.