सुरेश देवरमनी यांचे यश
10:51 AM Oct 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : गुजरातमधील सुरत येथे झालेल्या वयस्करांच्या राष्ट्रीय फेडरेशनने आयोजित राष्ट्रीय वयस्करांच्या स्पर्धेत बेळगावचे वयस्कर धावपटू सुरेश देवरमनी यांनी आपल्या गटात विविध क्रीडा प्रकारात 2 रौप्य, 2 कास्यपदकसह यश संपादन केले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत बेळगावचे ज्येष्ठ धावपटू देवरमनी यांनी 70 वर्षाखालील गटात 15 कि. मी. धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक, 5 कि. मी. चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक, 4×100 मी. रिलेत रौप्यपदक, 4×400 रिलेत रौप्यपदक तर 800 मी. धावणे व 110 मी. अडथळा शर्यतीत चौथा क्रमांक पटकाविला. स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते पदके, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सुरेश देवरमनी हे दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार आहेत.
Advertisement
Advertisement