कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वृत्तपत्र जाहिरात क्षेत्रातील बुजुर्ग सुरेंद्र काकोडकर यांचे निधन

12:50 PM Apr 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : जाहिरात क्षेत्रात फार मोठे नाव कमावलेले आणि विविध वृत्तपत्रात जाहिरात व्यवस्थापक म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावलेले सुरेंद्र काकोडकर यांचे काल रविवारी सायंकाळी गोमेकॉत निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार दि. 1 मे रोजी सकाळी 10 वा. सांत इनेज येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. काकोडकर हे प्रख्यात जाहिरात व्यवस्थापक म्हणून गोव्यात ओळखले जात होते. यापूर्वी त्यांनी दैनिक तऊण भारतच्या गोवा आवृत्तीमध्ये एक तप जाहिरात व्यवस्थापक म्हणून उत्तम कामगिरी बजावली होती. काकोडकर हे विविध संघटनांशी तथा संस्थांची जोडले गेले होते. अन्यायाविऊद्ध त्यांना प्रचंड चीड होती आणि तशी ते वारंवार व्यक्त देखील करायचे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ते कट्टर समर्थक होते. त्याचबरोबर ते मराठी राजभाषेसाठी काम करणारे होते. पणजी शिगमोत्सव समितीचे ते अनेक वर्षे सदस्य म्हणून काम करीत होते. सर्व राजकीय नेत्यांशी त्यांचे खूप चांगले संबंध होते. गोमंतक मराठा समाजाच्या मुख्यपत्राचे संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्षे कार्य केले होते. गेली चार वर्षे ते आजारी होते. रविवारी सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले असता सायंकाळी उशिरा त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती सुप्रिया, पुत्र संकेत, कन्या संपदा तसेच सून व जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. काकोडकर यांच्या निधनाने वृत्तपत्रक्षेत्रातील अनेक जुन्या जाणत्या मंडळींनी हळहळ व्यक्त केली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article