For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वधर्मीय अन् गोरगरिबांचा आधारवड : आमदार राजू सेठ

10:15 AM Oct 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्वधर्मीय अन् गोरगरिबांचा आधारवड   आमदार राजू सेठ
Advertisement

आमदार असिफ उर्फ राजू सेठ वाढदिवस विशेष

Advertisement

बेळगाव शहर असो किवा जिल्हा. कुठूनही मदत मागण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रिकाम्या हाताने परत जाण्याची वेळ कधी आली नाही. अशा जिल्ह्यातील काही मोजक्याच घराण्यांपैकी एक म्हणजे सेठ घराणे. समाजसेवा या घराण्याच्या रक्तातच भिनली आहे. याच घराण्यातील आमदार असिफ उर्फ राजू सेठ यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. अतिशय मितभाषी स्वभावाचे आमदार राजूसाहेब म्हणजे अस्सल बावनकशी सोनंच म्हणावं लागेल. समाजसेवेतून आपल्या कर्तृत्वाचा डोंगर उभारणाऱ्या पण प्रसिद्धीपासून काहीसे लांब असणाऱ्या आमदार राजू सेठ यांचे कार्य अखंडपणे सुरू आहे. त्यांचे कार्य जिल्ह्यात सर्वदूर पसरले आहे. माजी आमदार फिरोज सेठ यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघासह संपूर्ण शहरात विकासाची गंगा आणली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत त्यांचे बंधू आमदार राजूसाहेब यांचे कार्य सुरू आहे. पूर्वीपासूनच आपण त्यांचे कार्य जाणून होतो. कोरोना काळात आपली व आमदारसाहेबांची ओळख झाली. त्यानंतर आपल्यातील नात्याची वीण आणखी घट्ट झाली.

कोरोना काळाने अक्षरश: जगात उलथापालथ घडवली. माणूस माणसांपासून दूर गेला. या साथीच्या आजाराने बेळगाव जिल्हा आणि निपाणी भागातही थैमान घातले. कोरोना रुग्णांची अवस्था तर बिकट होतीच, त्याचबरोबर कोरोनातील मृत व्यक्तींवर अक्षरश: बेवारसपणे अंत्यसंस्कार केले जात होते. हे पाहून राहवले नाही. यातूनच आपण सर्वांच्या सहकार्याने एकता फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुविधा आणि दुर्दैवाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी उचलली. याचदरम्यान आमदार अथवा कोणतेही संविधानिक पद नसताना राजू सेठ यांनी बेळगावात कोरोना रुग्णांसाठी सेवाकार्य सुरू केले होते. त्याची माहिती मिळताच त्यांच्याशी संपर्क साधला.

Advertisement

नि:स्वार्थी कार्य

आमच्या भावना आणि धडपड पाहून राजूसाहेबांनी तात्काळ सहकार्य सुरू केले. त्यानुसार निपाणी भागातून आपल्याकडे कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुविधा नसताना आम्ही अशा कोरोनाग्रस्त रुग्णांना बेळगावला पाठवत होतो. तेथे सरकारी किंवा खासगी रुग्णालय तसेच अंजुमन हॉलमध्ये अशा रुग्णांना दाखल करून घेत त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत स्वरूपात उपचार राजू सेठसाहेब करत होते. आमदार राजू सेठ यांनी कोणतीही जात-धर्म न पाहता कोरोनाकाळात केलेले काम अतिशय प्रेरणादायी ठरले. दुर्दैवाने या आजाराने मृत झालेल्या रुग्णांवर त्यांच्या धार्मिक विधीप्रमाणे अंत्यसंस्कार केले जात होते. या काळात सेठ घराणे जरादेखील मागे राहिले नाही. त्यांच्या या नि:स्वार्थी कार्याची दखल घेत बेळगाव उत्तर मतदारसंघातील जनतेने गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजू सेठ यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले.

बेळगाव जिल्हा अंजुमन कमिटीचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे कार्य

खानदानी श्रीमंती घरी असताना केवळ आपण समाजासाठी काही तरी देणे लागतो या भावनेतून सेठ कुटुंबाचे कार्य सुरू आहे. विधानसभेवर निवडून आल्यानंतर गेल्या दीड वर्षात राजूसाहेब यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघात प्रचंड प्रमाणात विकासकामे राबवली आहेत. त्यांच्याकडे कामानिमित्त गेलेला कोणीही रिकाम्या हाताने परतत नाही. लग्न असो, शिक्षण किंवा दवाखान्याची अडचण असली तरी सेठ घराण्याने गरजूंसाठी आपला हात सदैव सैल सोडला. पाण्याला कोणताही रंग, रूप, चव नसते. ते जाईल तेथे एकरूप होते. अशाच पद्धतीने बेळगावसारख्या संवेदनशील शहरात जातीय सलोखा कायम ठेवत सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अथवा अन्य धर्मियांच्या सण, समारंभांमध्ये सेठ घराणे नेहमी अग्रेसर असते. आमदार राजू सेठ हे अनेक वर्षांपासून बेळगाव जिल्हा अंजुमन कमिटीचे अध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत. या काळात अंजुमनला एका नव्या उंचीवर नेण्याचे कार्य त्यांनी केले आहे. अंजुमनतर्फे शाळा, महाविद्यालये सुरू करताना गरजूंना नेहमीच मदतीचा हात दिला आहे.

सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र झटणारे आमदार राजू सेठ

आमदार राजू सेठ यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या समाजसेवेचा वारसा त्यांचे पुत्र अमन सेठ हे समर्थपणे सांभाळत आहेत. अमन यांनी सर्वसामान्य जनतेसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यावर संपर्क साधल्यानंतर तात्काळ संबंधित व्यक्तीचे काम पूर्ण करण्यासाठी पावले उचलली जातात. आमदार राजू सेठ यांचे वैशिष्ट्या म्हणजे त्यांना भेटण्यासाठी कोणतीही अपॉईंटमेंट अथवा पूर्वपरवानगी घ्यावी लागत नाही. सहज भेटणे आणि तात्काळ काम करणे ही त्यांची खासियत. सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र झटणारा हा माणूस म्हणजे आजच्या काळातील देवमाणूस म्हणावा लागेल. माझ्यासाठी सदैव आदर्श आणि आधारस्तंभ असणाऱ्या आमदार राजूसाहेब सेठ यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

हाजी मैनुद्दीन सैफुद्दीन मुल्ला, निपाणी

Advertisement
Tags :

.