सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या आंदोलनास सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाचा जाहीर पाठिंबा
आचरा प्रतिनिधी
सेवा निवृत्त शिक्षकांच्या दिनांक १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाला सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्गचा जाहीर पाठिंबा असून या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. अशी माहिती सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाचे उपाध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी दिली.
सेवा निवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाच्या सुद्धा अनेक मागण्या प्रलंबित असुन त्याचा सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. त्यातील प्रमुख मागणी सेवा निवृत्तांचे पेन्शन महिन्याच्या १ किंवा २ तारीखला होणे अत्यंत आवश्यक असतानाही त्याकडे प्रशासन गांभीर्याने बघत नाही आणि म्हणून प्रशासनाचा या महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी सेवा निवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाने सेवा निवृत्त शिक्षक संघटनेच्या आंदोलनास पूर्ण पाठिंबा देवून आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाचे अध्यक्ष प्रकाश राणे उपाध्यक्ष हनुमंत प्रभू ,सचिव प्रकाश बाबाजी राणे तसेच कार्यकारीणी सदस्य दिनांक १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनात सहभाग घेऊन उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सेवा निवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाचे अध्यक्ष प्रकाश राणे उपाध्यक्ष हनुमंत प्रभू सचिव प्रकाश बाबाजी राणे यांनी दिली आहे.