महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सौंदत्ती-रामदुर्गमधून मृणाल हेब्बाळकर यांना पाठिंबा

10:42 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना सौंदत्ती व रामदुर्ग विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. शुक्रवारी मृणाल यांच्या घरी येऊन या नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. सौंदत्ती व रामदुर्ग विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या गावातून मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते बेळगावला आले होते. काँग्रेस पक्षाने केलेला विकास, महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केलेला विकास पाहून आम्ही मृणाल यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे या नेत्यांनी सांगितले. आपापल्या गावातील नागरिकांनाही काँग्रेसला पाठिंबा देण्यासंबंधी आवाहन करण्यात येणार आहे. बाहेरच्या उमेदवाराला पाठिंबा राहणार नाही, असे या नेत्यांनी सांगितले. लक्ष्मी हेब्बाळकर व मृणाल हेब्बाळकर यांनी या दोन्ही मतदारसंघातून आलेल्या नेते-कार्यकर्त्यांशी चर्चा करून सर्वाधिक मतांनी काँग्रेसला विजयी करा, मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article