For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपला साथ द्या, देशाला समृद्ध बनवू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

09:54 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपला साथ द्या  देशाला समृद्ध बनवू  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
Advertisement

 : बागलकोट येथे प्रचारसभेला उदंड प्रतिसाद

Advertisement

वार्ताहर /जमखंडी

आत्मनिर्भर व विकसित भारताचा संकल्प सिद्धीस नेऊन भवितव्य निश्चित करणारी यंदाची लोकसभेची निवडणूक आहे. याकरिता लागणारा दृष्टीकोन व 24 तास जीवन समर्पित करण्याची सिद्धता आहे. तरी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करून जगात भारत शक्तिशाली तिसऱ्या क्रमांकाचे राष्ट्र बनवूया, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बागलकोट येथे प्रचारसभेत केले. बागलकोटचे भाजप उमेदवार पी. सी. गद्दीगौडर व विजापूरचे उमेदवार रमेश जिगजिनगी यांच्या प्रचारार्थ बागलकोट येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. बागलकोट रेल्वे स्टेशनचा अमृत स्टेशनद्वारे विकास, रस्त्यांचे चौपदरीकरण, उद्योगाचे मोठे प्रकल्प या भागात करण्यात येत असून बदामी, पट्टदकल्ल आदी पर्यटन स्थळाचा विकास करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.   एका झटक्यात गरिबी हटवण्याची भाषा बोलणाऱ्या काँग्रेसला 60 वर्षाच्या अधिकारात गरिबी हटविता आली नाही. करोडो लोक मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले. त्यांच्याकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले होते, पण भाजप व एनडीए सत्तेवर आल्यानंतर गेल्या दहा वर्षात 18 हजार गावात पाणीपुरवठा केला. केवळ 16 टक्के लोकांना नळ पाणीपुरवठा केला जात होता. आपण सत्तेवर आल्यानंतर जलजीवन मिशनद्वारे योजना राबवून आज 75 टक्के लोकांना नळाद्वारे पाणी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.  व्यासपीठावर बी. एस. येडियुराप्पा, गोविंद कारजोळ, मुरगेश निराणी, आमदार सिद्धू सवदी, आमदार जगदीश गुडगुंटी, विजापूरचे आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ, माजी आमदार वीरण्णा चिरंतीमठ, उमेदवार पी. सी. गद्दीगौडर, रमेश जिगजिनगी, शांतगौड पाटील आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.