कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विकसित भारतासाठी भाजपला साथ द्या

10:41 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगदीश शेट्टर यांच्याकडून प्रचाराला सुरुवात

Advertisement

बेळगाव : भाजप हा विकासाच्या मुद्द्यावर लढणारा पक्ष आहे. मागील दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या विकासकामांचा लेखाजोखा घेऊन सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणार आहोत. बेळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी अनेक वर्षे काम केल्यामुळे या जिल्ह्याचा माझा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे बेळगावचा पुढील खासदार हा भाजपचाच असेल, असा विश्वास भाजपचे बेळगाव लोकसभेचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला. जगदीश शेट्टर यांनी सोमवारी व मंगळवारी बेळगावच्या विविध भागात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. विविध समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भाजपच्या विकासकामांची माहिती करून दिली. वैभवनगर, शाहूनगर येथे नागरिकांशी संवाद साधून चाय पे चर्चा केली. राज्यसभा माजी सदस्य प्रभाकर कोरे, कर्नाटक राज्याचे दिल्लीतील माजी प्रतिनिधी शंकरगौडा पाटील, माजी आमदार अनिल बेनके, बुडाचे माजी अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, भाजप नेते किरण जाधव, माजी उपमहापौर रेश्मा पाटील यांच्यासह भाजप नेत्यांनी शेट्टर यांच्या सोबत शहरात प्रचाराला सुरुवात केली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article