महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल

06:01 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली मद्य धोरणप्रकरणी ईडीने राऊस एव्हेन्यू न्यायालयात शुक्रवारी आठवे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. दोषारोपपत्रात विनोद चौहान यांना आरोपी करण्यात आले आहे. विनोद चौहान यांच्यावर हवालाद्वारे आम आदमी पार्टीला लाचेची रक्कम पाठवल्याचा आरोप आहे. ईडीने आतापर्यंत नऊ आरोपपत्रे दाखल केली आहेत. यापूर्वी 17 मे रोजी ईडीने सातवे पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. त्या आरोपपत्रात ईडीने आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांना आरोपी केले होते. 10 मे रोजी ईडीने सहावे पुरवणी आरोपपत्र दाखल केले असून त्यात बीआरएस नेत्या के. कविता, चनप्रीत सिंग, दामोदर शर्मा, प्रिन्स कुमार आणि अरविंद सिंग यांना आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणी आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि बीआरएस नेत्या के. कविता यांचा समावेश आहे. यापैकी सर्वोच्च न्यायालयाने संजय सिंह यांना जामीन मंजूर केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article