सुपरमॅनचा ट्रेलर प्रदर्शित
हॉलिवूडच्या यशस्वी सुपरहीरो मुव्ही फ्रेंचाइजीत सुपरमॅनचे नाव अवश्य सामील होते. मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा सुपरमॅन परतणार असून यावेळी रिपोर्टर क्लार्क केंट उर्फ सुपरमॅन (डेव्हिड कोरेन्सवेट)चा चेहरा नवा असेल. निर्मात्यांनी सुपरमॅनचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. सुपरमॅनच्या मागील भागांमध्ये लेक्स लूथर हा सुपरमॅनचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे दाखविण्यात आले होते. तो सुपरमॅनच्या शक्ती प्राप्त करत त्याचा खात्मा करून मानवता नष्ट करत जगावर राज्य करू इच्छितो. परंतु दरवेळी सुपरमॅनकडून त्याला हार पत्करावी लागते. नव्या युगातील सुपरमॅनमध्ये लेक्स लूथर आणखी शक्तिशाली झाला असून यावेळी तो केवळ सुपरमॅनच नव्हे तर त्याचा परिवार अन् प्रेयसी रिपोर्ट लुइस लेन (राचेल ब्रोसन्हान)ला नुकसान पोहोचवू इच्छितो. याची झलक ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसून येते. या चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स गनने केले आहे. हा ट्रेलर अॅक्शन आणि रोमांचाने युक्त असून तो चाहत्यांची मने जिंकत आहे. सुपरमॅनच्या या चित्रपटात पुन्हा एकदा चाहत्यांना स्वत:च्या पसंतीच्या सुपरहीरोचा अॅक्शन अवतार दिसून येणार आहे. या चित्रपटात डेव्हिड कोरेनस्वेट, राचेल ब्रोसनाहन, निकोलस हॉल्ट आणि नाथन क्रिस्टोफर फिलियन यासारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सुपरमॅन हा चित्रपट 11 जुलै रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.