‘सनस्टार’चा आयपीओ 19 रोजी होणार खुला
गुंतवणूकदारांना 23 जुलैपर्यंत बोली लावण्याची संधी : 510.15 कोटींची कंपनी करणार उभारणी
वृत्तसंस्था/ मुंबई
सनस्टार लिमिटेडची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर म्हणजेच आयपीओ 19 जुलै रोजी खुला होणार आहे. गुंतवणूकदार या इश्यूसाठी 23 जुलैपर्यंत बोली लावू शकतील. कंपनीचे शेअर्स 26 जुलै रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध केले जाणार असल्याची माहिती आहे.
कंपनीला या इश्यूद्वारे 510.15 कोटी उभारायचे आहेत. यासाठी कंपनी 397.10 कोटी किमतीचे 41,800,000 ताजे शेअर्स जारी करत आहे. तर, कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार 113.05 कोटी किमतीचे 11,900,000 शेअर्स आयपीओद्वारे विकणार आहेत.
किमान गुंतवणूक किती?
सनस्टार लिमिटेडने समभागाची किंमत 90-95 इतकी निश्चित केली आहे. किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉट म्हणजेच 150 शेअर्ससाठी बोली लावू शकतात. तुम्ही आयपीओच्या वरच्या प्राइस बँडवर 95 वर 1 लॉटसाठी अर्ज केल्यास, तुम्हाला 14,250 ची गुंतवणूक करावी लागणार असल्याची माहिती आहे.