सनफार्मा करणार टॅरोचे 21 टक्के अधिग्रहण
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजने गुऊवारी दिलेल्या माहितीनुसार ते इस्रायलची कंपनी टॅरो फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजची 21.52 टक्क्यांची हिस्सेदारी 2,891.76 कोटी ऊपयांमध्ये खरेदी करणार आहे. यामुळे आता दोन्ही कंपन्यांमधील एकत्रित येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येत आहे. सन फार्माने दिलेल्या माहितीनुसार 8,086,818 समभागाचे अधिग्रहण 2,891.76 कोटी ऊपयांमध्ये होणार आहे. यामुळे या व्यवहारानंतर मुंबई येथील औwwषध कंपनीने टॅरोच्या सर्व अन्य साधारण समभागांना विना व्याज 43 अमेरिकन डॉलर प्रति समभाग हे रोखीने खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे. टॅरोमध्ये सनफार्माची अगोदरपासूनची 78.48 टक्क्यांची हिस्सेदारी आहे. सन फार्माच्या धोरणात्मक हस्तक्षेपांमुळे, आव्हानात्मक वातावरणात जेनेरिक त्वचाविज्ञान बाजारपेठेत टॅरो ही आघाडीची कंपनी राहिली आहे, सन फार्माचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप सांघवी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. ते म्हणाले की रुग्ण आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी कंपनी प्रयत्न करणार आहे. टॅरोचे सीईओ उदय बलदोट्टा म्हणाले, टॅरो जगभरातील रुग्णांना आणि ग्राहकांना उच्च दर्जाची उत्पादने देण्यासाठी वचनबद्ध आहे. हे विलीनीकरण आम्हाला प्रभावीपणे स्पर्धा करण्यास सक्षम करेल असे स्पष्ट केले आहे.