For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चक्रीवादळामुळे लांबली सुनीता विलियम्सची वापसी

06:52 AM Oct 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
चक्रीवादळामुळे लांबली सुनीता विलियम्सची वापसी
Advertisement

नासा क्रू-8 मिशनला विलंब

Advertisement

वृत्तसंस्था/ फ्लोरिडा

सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकारवून पृथ्वीवर आणण्यासाठी नासा आणि स्पेसएक्सकडून राबविण्यात येणारी क्रू-8 मिशनची वापसी टळली आहे. ही मिशन पृथ्वीवर परतल्यावर स्पेस क्रू-9 मिशन राबविण्यात येणार आहे.

Advertisement

फ्लोरिडात भीषण चक्रीवादळामुळे मिशनची वापसी टळली आहे. हवामान अत्यंत अस्थिर असल्याने अनडॉकिंगचा प्रयत्न केला जाऊ शकत नाही. स्पेस क्रू-8 मिशनशी निगडित अंतराळवीर सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातच आहेत, तेथे सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर देखील आहेत. कुठलाही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी हवामानाच्या स्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहोत असे नासाकडून सांगण्यात आले.

क्रूचे सदस्य मॅथ्यू डोमिनिक, माइक बॅरेट, जीनेट एप्स (सर्व नासाचे सदस्य) आणि रोस्कोस्मोसचे अलेक्झेंडर ग्रेबेन्किन यांनी पृथ्वीवर परतण्याची तयारी पूर्ण केली आहे. नासा आणि स्पेसएक्सचे क्रू-8 मिशन अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विलियम्स यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी रवाना करण्यात आले होते. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना जून महिन्यात बोइंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून 8 दिवसांच्या मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठविण्यात आले होते.

परंतु स्टारलाइनरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने यान सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांच्याशिवायच पृथ्वीवर परतले होते. क्रू-9 मिशनमध्ये सुनीता विलियम्स आणि विल्मोर यांना फेब्रुवारी 2025 पर्यंत परत आणण्याचे लक्ष्य आहे.

नासा आणि स्पेसएक्स क्रू-8 मिशनच्या स्थितीवर नजर ठेवून आहेत. चालू आठवड्याच्या अखेरपर्यंत हवामानात सुधारणा होणार असल्याचा हवामान विभागाचा पूर्वानुमान आहे. यामुळे क्रू-8 मिशन पृथ्वीवर परतण्यासाठी एक सुरक्षित कालावधी उपलब्ध होणार आहे.

Advertisement
Tags :

.