For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिसऱ्यांदा अंतराळात पोहोचल्या सुनीता विलियम्स

06:58 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
तिसऱ्यांदा अंतराळात पोहोचल्या सुनीता विलियम्स
Advertisement

अंतराळ स्थानकात नृत्य करत केला आनंद व्यक्त

Advertisement

► वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे बोइंग स्टारलायनर अंतराळयानाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय अंतराळात स्थानकात पोहोचले आहेत. 59 वर्षीय सुनीता एका नव्या चालक दलाच्या अंतराळयानाचे संचालन आणि परीक्षण करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.  सुनीता विलियम्स आता तिसऱ्यांदा अंतराळात पोहोचल्या आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचल्यावर नृत्य करत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Advertisement

विलियम्स आणि विल्मोर यांचे स्वागत घंटा वाजवून करण्यात आले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील ही जुनी परंपरा आहे. अंतराळ स्थानकावरील उर्वरित सदस्यांना एक परिवार ठरवत सुनीता विलियम्स यांनी मोठ्या स्वागतासाठी त्यांचे आभार मानले आहेत. विलियम्स आणि विल्मोर हे स्टारलायनरमधून उ•ाण करणारे पहिले अंतराळवीर आहेत. फ्लोरिडाच्या केप कॅनावेरल स्पेस फोर्स स्टेशनमधून प्रक्षेपण झाल्यावर सुमारे 26 तासांनी त्यांनी बोइंग अंतराळयानाला यशस्वीपणे अंतराळस्थानकापर्यंत पोहोचविले आहे. दोन्ही अंतराळवीरांना स्टारलायनयर अंतराळस्थानकाशी जोडले जाण्यापूर्वी पाहणी केली होती.

एक आठवडा असणार वास्तव्य

सुनीता विलियम्स आणि विल्मोर हे एक आठवडा अंतराळात वास्तव्य करणार आहेत. तसेच विविध परीक्षणांमध्ये सहाय्य करत वैज्ञानिक प्रयोगात भाग घेणार आहेत. स्टारलायनरच्या मदतीने पृथ्वीवर परतताना समुद्राऐवजी जमिनीवर उतरण्याची त्यांची योजना आहे. नासा नेहमीच अंतराळवीरांना नेण्यासाठी स्पेसएक्स क्रू मॉड्यूलला एक पर्याय इच्छित होता आणि बोइंग स्टारलायनर कमर्शियल क्रू प्रोग्रामच्या हिस्स्याच्या स्वरुपात याला आकार देत आहे.

घरी परतल्यासारखी अनुभूती

उड्डाणापूर्वी मी काहीशी घाबरले होते. नव्या अंतराळयानातून उड्डाण करण्याबद्दल ही भीती नव्हती. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्यावर घरी परतल्यासारखी अनुभूती झाल्याचे सुनीता विलियम्स यांनी म्हटले आहे. विलियम्स यांनी स्टारलायनरला डिझाइन करण्यास मदत केली आहे. या अंतराळयानात 7 जण सामावू शकतात. विलियम्स यांनी यापूर्वीच्या अंतराळाप्रवासात भगवान गणेशाची मूर्ती आणि भगवद्गीता सोबत नेली होती.

Advertisement
Tags :

.