महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुनीता विल्यम्सची अंतराळातून पत्रकार परिषद

06:34 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तंदुरुस्त असल्याची दिली खात्री : अमेरिका निवडणुकीत मतदान करण्याचीही इच्छा व्यक्त

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

अंतराळवीर सुनीता विल्यम्सला अवकाशात अडकून अनेक महिने झाले असून आता ती पुढच्या वषी पृथ्वीवर परतणार आहे. याचदरम्यान, तिने आपले सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांच्यासोबत प्रथमच पत्रकार परिषद घेतली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे देताना ‘अवकाश यात्रेत अशा घटना घडू शकतात’ असे वक्तव्य करत आपण तंदुरुस्त असल्याची खात्री जगाला दिली.

गेल्या आठवड्यात बोईंग स्टारलाइनर पॅप्सूल पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी बोईंगवर अनेक अतिरिक्त महिने उ•ाण आणि कक्षेत घालवणे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण असल्याचे स्पष्ट केले. शुक्रवारी भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12.15 वाजता सुनीता विल्यम्स यांची पत्रकार परिषद सुरू झाली. यावेळी सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांनी माध्यमांच्या प्रŽांना उत्तरे देत आपल्या भावनाही सांगितल्या. अंतराळात अनेक महिने घालवणे कठीण असले तरी आपल्याला अंतराळात राहण्याचा आनंद मिळतो, असे सुनीता म्हणाली.

सहकारी अंतराळवीर विल्मोर काय म्हणाले?

सुनीताचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांनी सांगितले की, आपली धाकटी कन्या हायस्कूलच्या शेवटच्या वर्षात शिकत असताना आपण तेथे नसल्याबद्दल मी दु:खी आहे. यासोबतच त्यांनी शुभेच्छा पाठवणाऱ्यांचेही आभार मानले. तसेच आम्ही दोघेही आता नासाच्या स्पेस स्टेशनवर देखभाल आणि नवीन प्रयोगांवर काम करत असल्याचेही विल्मोर यांनी सांगितले.

अमेरिकन निवडणुकीवर भाष्य

दोन्ही अंतराळवीरांनी नागरी कर्तव्यांवरही भर देत येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यांनी मतपत्रिकेची विनंती करत अंतराळातून मतदान करण्याची अनुमती आम्हाला मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. अमेरिकेत 5 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

आईच्या आठवणीने भावुक

पत्रकार परिषदेमध्ये एक क्षण असा आला की सुनीता भावुक झाली. तिने सांगितले की आपल्याला आईसोबत अधिक वेळ घालवायचा आहे, परंतु एकाच मोहिमेवर दोन भिन्न अंतराळयानांवर बसून आनंद झाला. आपण एक ‘टस्टर’ आहे आणि हे आपले कामच आहे, असेही सुनीता म्हणाली. तसेच बोईंग स्टारलाइनर पृथ्वीवर परतताना पाहून त्यांना वाईट वाटल्याचेही दोन्ही अंतराळवीरांनी सांगितले.

फेब्रुवारी 2025 मध्ये परतणार?

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे बोईंगच्या स्टारलाइनरमधून अंतराळ प्रवासाला गेले आहेत. पण तांत्रिक बिघाडामुळे ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातच अडकून पडले. अलीकडेच, बोईंग स्टारलाइनर क्रूशिवाय पृथ्वीवर उतरले. नासाने आता सुनीता आणि विल्मोर यांच्या परतीसाठी योजना तयार केली आहे. ते क्रू-9 मिशनचा भाग असतील आणि फेब्रुवारी 2025 मध्ये पृथ्वीवर परततील. सुनीता आणि विल्मोर आठ दिवसांच्या मोहिमेसाठी अवकाश दौऱ्यावर गेले होते, पण आता त्यांना तिथे आठ महिन्यांहून अधिक काळ राहावे लागणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#international#social media#sunita
Next Article