कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुनिल गुडलर पुन्हा गजाआड

12:57 PM Apr 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महम्मद हुसेनलाही अटक : लाचखोरी प्रकरणी दोघेही एसीबीच्या जाळ्यात

Advertisement

पणजी : भ्रष्टाचार विरोधी विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत मडगाव रेल्वे पोलिसस्थानकातील निरीक्षक सुनिल गुडलर आणि हवालदार हुसेन याला 25 हजार ऊपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. पोलिस सेवेच्या कारकीर्दीत विविध प्रकरणात अडकून वादग्रस्त ठरलेला निरीक्षक सुनिल गुडलर पुन्हा एकदा नव्या प्रकरणात अडकल्याने पोलिस खात्याच्या बदनामीस कारणीभूत ठरला आहे. कर्नाटकातून रेल्वेमार्गे गोव्यात आलेले मांस गोव्यात अडविले होते. बेळगावातील मांस विक्रेत्याकडे प्रकरण मिटविण्यासाठी गुडलर व हुसेन यांनी 2 लाख ऊपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार दर महिन्याला 25  हजार ऊपये देण्याचे विक्रेत्याने मान्य केले होते. सोमवारी रात्री पहिला हप्ता स्विकारल्यानंतर निरीक्षक सुनिल गुडलर आणि हवालदार हुसेन यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.

Advertisement

याबाबत 21 रोजी भ्रष्टाचारी विरोधी विभागाकडे लेखी तक्रार आली होती. त्यानुसार सापळा सचून संशयितांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एसीबी अधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी दिली आहे. मडगाव येथे रेल्वे पोलिसांनी जप्त केलेल्या मांसाबाबत बेळगावातील एका मांस विक्रेत्याला सुनिल गुडलर याने कळविले असता आपला काहीही संबंध नसल्याचे त्या विक्रेत्यांने सांगितले होते. तरीही त्याच्या विरोधात तक्रार नोंद करण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांची धमकी मिळूनही तक्रारदार त्यांना भाव देत नसल्याचे तसेच त्यांचे फोनही घेत नसल्याचे आढळून आल्यामुळे हेड कॉन्स्टेबल हुसेन थेट तक्रारदाराच्या घरी बेळगाव येथे पोहोचला. तिथे जाऊन तक्रार नको असल्यास 2 लाख ऊपये देण्याची मागणी केली. दोन लाख रुपये एकत्रित देणे शक्य नसल्याचे सांगितल्यावर दर महिन्याला 25 हजार ऊपये द्यावे, यावर एकमत झाले.

तक्रारदाराने एका बाजूने पैसे देण्याचे मान्य केले, तर दुसऱ्या बाजूने लाच मागणाऱ्या पोलिसांना धडा शिकविण्याचा डावही त्याने रचला. तक्रारदाराला पोलिस निरीक्षक सुनिल गुडलर यांनी लाच देण्यास जरी भाग पाडले तरी त्याने व्यवस्थित सापळा रचून पोलिसांना अडकविले. हवालदार हुसेन याच्याशी झालेला संवाद त्याने रेकॉर्ड करून ते रेकॉर्डिंग नंतर एसीबीकडे दिले. 2010-11 मध्ये ब्रिटिश युवती स्कारलेटच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणामुळे राज्यातील कायदा अंमलबजावणीच्या प्रामाणिकपणाबद्दल प्रश्न उपस्थित झाला होता. या तपासादरम्यान समोर आलेल्या नावांमध्ये संशयित पोलिस निरीक्षक सुनिल गुडलर याचा समावेश होता. इस्रायली नागरिक डेव्हिड ड्रिहॅम, ज्याला दुडू म्हणूनही ओळखले जाते, त्याच्या विरोधात बनावट आरोप करण्याच्या कटात  संशयित गुडलर अडकला होता. उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने यापूर्वी गुडलर आणि माजी पोलिस उपअधीक्षक नरेश म्हामल यांच्यासह अनेक व्यक्तींविऊद्ध आरोप निश्चित केले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article