सुनील भातकांडे बेस्ट फिजीकचा मानकरी
आंतरमहाविद्यालय स्पर्धेत शुभम नावलकरचा मान
बेळगाव : माध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ झेंडा चौक,मार्केट व बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालय स्पर्धेत एस. जी. बाळेकुंद्री महाविद्यालयाच्या शुभम नावलकरने व बेस्ट फिजीक तर जिल्हास्तरीय बेस्ट फिजीक स्पर्धेत पॉलिहैड्रॉनच्या सुनील भातकांडे यांनी आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर बेस्ट फिजीकचा किताब पटकाविला. रामनाथ मंगल कार्यालय भाग्यनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या मार्केट झेंडा चौक गणेशोत्सव मंडळातर्फे गेली 19 वर्षे ही शरीरसौष्ठव स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिरीष गोगटे, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अविनाश पोतदार, डॉ. रवी पाटील, आशियाई पंच अजित सिद्दण्णवर, सचिन हंगिरगेकर, विशाल मुरकुंबी, मोतीचंद दोरकाडी, राहुल चौगुले, विनायक पाटील, कृष्णमूर्ती एस., विजय तलवार, अमित किल्लेकर, राजू हंगिरगेकर, एम. गंगाधार, हेमंत हावळ, श्रीराम कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. गणेशमूर्तींचे पूजन शिरीश गोगटे यांच्या हस्ते, हनुमान मूर्तींचे पूजन डॉ. रवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत टॉपटेनमध्ये 1) शुभम नावलकर (एस.जी. बाळेकुंद्री, 2) आदित्य सुळगेकर (जी. बी. फिटनेस), 3)प्रशांत मिसाळे (लाईफ टाईम), 4) प्रसाद बेळगुंदकर (बी. स्ट्राँग), 5) आदित्य पवार (नेक्स्ट लेव्हल), 6) आकाश जाधव (रॉ फिटनेस), 7) हुजीप लतीफ (बॉडी पॉवर), 8) शुभम रायकर (गोमटेश), 9) संजू गिरप्पगौडर (आर. एन. शेट्टी), 10) ऋषभ गोवेकर (गोमटेश) यांनी विजेतेपद पटकाविले.
जिल्हास्तरीय बेस्ट फिजीक टॉपटेन स्पर्धेत 1) सुनील भातकांडे (पॉलिहैड्रॉन), 2) संतोष हुंदरे (गोल्ड जीम), 3) आदित्य सुळगेकर (जी.बी. फिट), 4) मष्णू कदम-खानापूर (फ्लॅक्स), 5) प्रसाद बेळगावकर (बी स्ट्राँग), 6) आकाश जोगानी (रॉ फिटनेस), 7) विकास गोटराळे (मोरया), 8) आर्यन पाटील (मोरया), 9) आकाश लोहार (बुल रॉक), 10) अझर गवंडी (नेक्स्ट लेव्हल) यांनी विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेनंतर प्रमुख पाहुणे डॉ. रवी पाटील, कृष्णमूर्ती, अजित सिद्दण्णावर, विनोद तलवार, अमित किल्लेकर, राजू होनगेकर, सचिन हंगिरगेकर, विशाल मुरकुंबी, श्रीराम कुलकर्णी, एम. गंगाधर, हेमंत हावळ आदी मान्यवरांच्या हस्ते आंतरमहाविद्यालयीन विजेत्या नावलकर व जिल्हास्तरीय विजेत्या सुनील भातकांडे यांना आकर्षक चषक, रोख रक्कम, फिरता चषक, प्रमाणपत्र, चषक देवून गौरविण्यात आले. पंच म्हणून अजित सिद्दण्णावर, एम. गंगाधर, एम. के. गुरव, हेमंत हावळ, सुनील पवार, अनंत लंगरकांडे, सुनील अष्टेकर, नूर मुल्ला, हंगिरगेकर, बसवराज अरळीमट्टी, आकाश हुलीयार, तर स्टेज मार्शल म्हणून सुनील राऊत यांनी काम पाहिले.