For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात रविवार ठरला घातवार

06:49 AM Jul 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
राज्यात रविवार ठरला घातवार
Advertisement

वेगवेगळ्या घटनांमध्ये 15 जणांचा मृत्यू 

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यात रविवार घातवार ठरला असून वेगवेगळ्या चार घटनांमध्ये तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला आहे. रामनगरजवळ कार भिंतीला धडकल्याने चार जणांचा मृत्यू झाला. मंत्रालयाला भेट देण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून जीव गेला आहे. तर हृदयविकाराच्या झटक्मयाने सहा जणांचा मृत्यू झाला असून कर्जाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे.

Advertisement

बेंगळूर-म्हैसूर महामार्गावरील जयपूर ब्रिजजवळ कारचा अपघात झाला आहे. मुत्तुराजू (वय 55), तम्मनगौडा (वय 27), संजू (वय 28) आणि चालक सचिन (वय 27, सर्वजण रा. के. आर. पेठ, मंड्या जिल्हा) अशी अपघातातील मृतांची नावे आहे. हा अपघात इतका भीषण होता की जाग्यावरच तिघांचा मृत्यू झाला तर एकाचा उपचाराचा उपयोग न झाल्याने रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तुंगभद्रा नदीत बुडून तिघांचा मृत्यू

मंत्रालयाला भेट दिल्यानंतर तुंगभद्रा नदीत पोहायला गेलेल्या तीन भाविकांना पोहता न आल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. अजित (वय 20), सचिन (वय 20) आणि प्रमोद (वय 19, सर्वजण रा. जागवल, हासन जिल्हा) अशी मृतांची नावे आहेत. ते आपल्या मित्रांासह मंत्रालयात आले होते. हे सर्वजण पदवीचे शिक्षण घेत होते. तुंगभद्रा नदीत अंघोळ करताना ही दुर्घटना घडली आहे.

हृदयविकाराने दिवसभरात सहा जणांचा बळी

राज्यात हृदयविकाराच्या झटक्मयाने मृत्यू होण्याच्या घटनांत दररोज वाढच होत आहे. रविवारी म्हैसूरमध्ये दोघांचा, दावणगेरे, गदग, चिक्कमंगळूर आणि रायचूरमध्ये एकाचा बळी गेला आहे. आज एकाच दिवसात सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. म्हैसूरमध्ये सरकारी कर्मचाऱ्याचा बसमध्ये प्रवास करताना हृदयविकाराच्या झटका आल्याने मृत्यू झाला. अरुण (वय 44) असे मृताचे नाव आहे. याचबरोबर टी. नरसिपूर येथील मंदिराच्या पुजाराचा मृत्यू झाला आहे. संपतकुमार असे मृताचे नाव आहे.

दावणगेरेत हृदयविकाराने आणखी एकाला जीव गमवावा लागला असून मॉर्निंग वॉक करताना झटका आला आहे. अनिलकुमार (वय 40, रा. शक्तिनगर), असे मृताचे नाव असून ते उद्योगपती होते. बेंगळूरमध्ये डान्स करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने बसवराज याचा मृत्यू झाला आहे. ते रायचूर जिल्ह्याच्या सर्जापूर येथील रहिवासी आहेत. गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर येथील रहिवासी शोभा वडकण्णवर (वय 42) यांना छातीत दुखल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. बेंगळूरहून चिक्कमंगळूर जिल्ह्याच्या सहलीला गेलेल्या अभियंत्याचा हृदयविकाराच्या झटक्मयाने मृत्यू झाला. राहुल (वय 29) असे मृताचे नाव असून तो सॉफ्टवेअर अभियंता होता. सहलीला गेल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्मयाने त्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

कर्जबाजारीने एकाच गावातील दोघांनी संपविले जीवन

कर्जाला कंटाळून एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. कुंदगोळ तालुक्याच्या बरद्वाड येथे ही घटना घडली. रविराज जाडर (वय 42) आणि बसवनगौडा पाटील (वय 56) अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत. गेल्या 24 तासांत दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद कुंदगोळ पोलीस स्थानकात झाली असून तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.