महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नेव्हिल रॉय सिंघमला ईडीकडून समन्स जारी

07:00 AM Nov 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘न्यूजक्लिक’च्या फंडिंग प्रकरणात होणार चौकशी

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अमेरिकन उद्योगपती नेव्हिल रॉय सिंघम याला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. न्यूज वेबसाईट ‘न्यूजक्लिक’च्या फंडिंग प्रकरणात ईडीला त्याची चौकशी करायची आहे. चीनकडून पैसे घेऊन अपप्रचार केल्याचा आरोप ‘न्यूजक्लिक’वर आहे. ऑगस्ट 2023 मध्ये एका अमेरिकन वृत्तपत्राने सिंघमची कंपनी चीन सरकारकडून पैसे घेत असल्याचा आणि आपला नियोजित प्रचार जगभर पसरवल्याचा खुलासा केल्यानंतर नेव्हिल रॉय सिंघम पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. या अहवालामुळे जगातील अनेक देशांमध्ये खळबळ उडाली होती. अमेरिका आणि भारतासह अनेक देशांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यानंतर भारतीय तपास यंत्रणेने पहिल्यांदाच सिंघमला थेट समन्स बजावले आहे.

सिंघम भारताच्या रडारवर

अमेरिकन वृत्तपत्राने सिंघमवर केलेल्या खुलाशानंतर भारत सरकारच्या अनेक एजन्सी सक्रिय झाल्या. दिल्ली पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये एफआयआर नोंदवला. या एफआयआरमध्ये नेव्हिल रॉय सिंघम, पत्रकार प्रबीर पुरकायस्थ, इतिहासकार विजय प्रसाद आणि इतरांना आरोपी करण्यात आले होते. या सर्व लोकांनी कोविड -19 नियंत्रित करण्यासाठी भारत सरकारच्या प्रयत्नांना बदनाम करण्यासाठी न्यूजक्लिक वेबसाइटद्वारे सक्रियपणे खोट्या बातम्यांचा प्रचार केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आपल्या एफआयआरमध्ये केला आहे. त्यांनी देशांतर्गत औषध उद्योग आणि देशविरोधी शक्तींच्या संगनमताने लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या भारत सरकारच्या धोरणे आणि विकास उपक्रमांबद्दल दिशाभूल करणारे आणि खोटे कथन करून राष्ट्रहिताच्या विरोधात कृती केल्याचेही एफआयआरमध्ये पुढे म्हटले आहे.

कोण आहे नेव्हिल रॉय सिंघम?

1954 मध्ये अमेरिकेत जन्मलेल्या नेव्हिल रॉय सिंघमचे वडील मूळचे श्रीलंकेचे होते. सिंघमच्या वडिलांचे नाव आर्चीबाल्ड विक्रमराजा सिंघम होते. अमेरिकेत कॉलेजमध्ये शिकत असताना सिंघम रिव्होल्यूशनरी ब्लॅक वर्कर्स लीग या अमेरिकन कामगार संघटनेत सामील झाले. त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. ही लीग डाव्या विचारसरणीशी निगडीत होती. त्यानंतर सिंघम हार्वर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी गेला. 1980 मध्ये येथून परत आल्यावर त्यांनी थॉटवर्क या कन्सल्टन्सी फॉर्मची स्थापना केली. सुऊवातीला हा प्रकार फक्त शिकागोपुरता मर्यादित होता. 2001 ते 2008 पर्यंत, सिंघमने ‘हुवाई’साठी धोरणात्मक तंत्रज्ञान सल्लागार म्हणून काम केले. यानंतर बरीच प्रगती करत कंपनीने मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल आणि द गार्डियन सारख्या कंपन्यांना टेक सल्ला देण्यास सुऊवात केली. यानंतर सिंघमच्या कंपनीने प्रामुख्याने चीनवर लक्ष केंद्रित कर कंपनीचे मुख्यालय येथे हलवले. कंपनीच्या चीनकडे जाण्यामागे सिंघमची मार्क्सवाद विचारधारा हेही प्रमुख कारण मानले जाते. सिंघमची कंपनी थॉटवर्क सध्या जगभरातील 30 हून अधिक कंपन्यांसोबत काम करत आहे. यामध्ये बँका, माध्यम समूह इत्यादींचा समावेश आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article