For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुमित नागल उपांत्य फेरीत

06:22 AM Feb 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुमित नागल उपांत्य फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

भारताचा अव्वल टेनिसपटू सुमित नागलने झेक प्रजासत्ताकच्या बिगरमानांकित डॉमिनिक पालनचा 6-3, 6-3 असा पराभव करून चेन्नई ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले तर शशीकुमार मुकुंद पराभूत झाला.

दुसरे मानांकन मिळालेल्या सुमित नागलची पुढील लढत झेकच्या तिसऱ्या मानांकित डॅलिबोर स्वर्सिनाशी होणार आहे. शशीकुमार मुकुंदचे आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. स्वर्सिनाने शशीकुमारचा 6-7 (6-8), 6-2, 6-4 असा पराभव केला. अन्य एका सामन्यात तैवानच्या चुन सिन त्सेंगने इटलीच्या एन्रिको डॅलाचा 7-5, 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

Advertisement

Advertisement
Tags :

.