For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुमित नागल दुसऱ्या फेरीत

06:29 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुमित नागल दुसऱ्या फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ पेरुजिया, इटली

Advertisement

भारताचा अव्वल टेनिसपटू सुमित नागलने येथे सुरू असलेल्या एटीपी 125 पेरुजिया चॅलेंजर स्पर्धेत बोस्नियाच्या नेर्मन फॅटिकचा पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.

या स्पर्धेत सहावे मानांकन मिळालेल्या सुमितने फॅटिकवर 7-6 (7-1), 6-2 असा विजय मिळविला. पहिल्या फेरीचा हा सामना सुमारे दोन तास चालला होता. गेल्या आठवड्यात सुमित नागलने जर्मनीत झालेल्या हीलब्रॉन नेकरकप चॅलेंजर स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. पहिल्या सेटमध्ये दोघांत चुरस पहावयास मिळाली आणि टायब्रेकरवर हा सेट सुमितने जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये सुमितने वर्चस्व राखत सेटसह सामना जिंकत आगेकूच केली. त्याची पुढील लढत स्थानिक खेळाडू अलेसांड्रो जियानेसीविरुद्ध होईल. या विजयामुळे सुमितची एटीपी क्रमवारीत दोन स्थानांनी प्रगती झाली असून तो आता 73 व्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र याआधीच त्याने पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला आहे.

Advertisement

Advertisement

.