महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुमित अॅन्टिलचा भालाफेकीत सुवर्णवेध

06:58 AM Sep 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राकेशकुमार-शीतलदेवी यांना कांस्य, नित्या श्री सिवनला कांस्य

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

2024 च्या पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा अॅथलिट सुमित अॅन्टीलने पुरूषांच्या एफ-64 भालाफेक प्रकारात नव्या विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले. टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक मिळविले होते. मिश्र सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात भारताचे तिरंदाजपटू राकेशकुमार आणि शीतलदेवी यांनी तर महिलांच्या एसएच-6 बॅडमिंटन प्रकारात नित्या श्री सिवनने कांस्यपदक मिळविले.

पुरूषांच्या एफ-64 भालाफेक प्रकारात सुमित अॅन्टीलने आपले निर्विवाद वर्चस्व राखताना यापूर्वी स्वत:च नोंदविलेला ऑलिम्पिक विक्रम मोडीत काढत नवा स्पर्धा विक्रम केला. सुमित अॅन्टीलने 70.59 मीटर भालाफेक करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. चार वर्षांपूर्वी झालेल्या टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुमित अॅन्टीलने सुवर्णपदक मिळविताना 68.55 मीटरचा स्पर्धा विक्रम नोंदविला होता. या क्रीडा प्रकारात सुमित अॅन्टीलने पहिल्या प्रयत्नात 69.11 मीटरची नोंद केली. त्यानंतर त्याने पुढील प्रयत्नात 70.59 मीटरची नोंद करत नवा पॅराऑलिम्पिक विक्रम केला. या स्पर्धेतील भारताचे हे तिसरे सुवर्णपदक आहे. पुरूषांच्या भालाफेक प्रकारात भारताचा संदीप याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. लंकेच्या डुलेन कोडीथवेकुने 67.03 मीटर भालाफेक करत रौप्य पदक तर ऑस्ट्रेलियाच्या मिचेल ब्युरेनने 64.89 मीटरचा भालाफेक करत कांस्यपदक घेतले.

तत्पूर्वी भारताचा बॅडमिंटनपटू नितेशने पुरूषांच्या एसएल-3 एकेरीत सुवर्णपदक मिळविले होते. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महिला नेमबाज अवनी लेखराने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते.

तिरंदाजीत कांस्यपदक

मिश्र सांघिक कंपाऊंड तिरंदाजीमध्ये भारताच्या राकेश कुमार आणि शीतलदेवी यांनी कांस्यपदक मिळविताना इटलीच्या सॅरेटी व बोनासिना यांचा पराभव केला. राकेशकुमार आणि शीतलदेवी यांनी इटलीच्या जोडीचा 156-155 अशा केवळ एका गुणाच्या फरकाने पराभव केला. इराणच्या फातेमी हेमाथी आणि हेदी नुरी यांनी या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळविले.

महिलांच्या एसएच-6 बॅडमिंटन एकेरीत भारताच्या नित्या श्री सिवनने कांस्यपदक मिळविताना इंडोनेशीयाच्या रिना मॅरेलिनाचा 21-14, 21-6 अशा गेम्समध्ये पराभव केला. तत्पूर्वी खेळविण्यात आलेल्या या क्रीडा प्रकारातील उपांत्य लढतीत चीनच्या लीन शुआंगबावोने नित्याचा 21-13, 21-19 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.

कांचनचे पदक हुकले

महिलांच्या एफ-3 थाळीफेकमध्ये भारताच्या कांचनचे पदक थोडक्यात हुकले. तिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या क्रीडा प्रकारात कांचनने 10.06 मीटरची थाळीफेक झाली. या क्रीडा प्रकारात ब्राझीलच्या एलीझाबेथ रॉड्रीग्जने सुवर्णपदक मिळविताना 17.37 मी.ची नोंद केली. जपानच्या ओनीदानीने रौप्य पदक मिळविताना 15.78 मीटरची तर युक्रेनच्या ओव्हीसीलने कांस्य पदक मिळविताना 14.17 मीटरची नोंद केली.

महिलांच्या 400 मीटर टी-20 धावण्याच्या प्रकारात भारताच्या दिप्ती जीवनजीने 55.45 सेकंदांचा अवधी घेत अंतिम फेरीसाठी पात्रता सिद्ध केली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article