सुलतान आणि राम्या ठरले 'देवाभाऊ केसरी'चे मानकरी
कवठेमहांकाळ :
सुमारे पाच किलोमीटरचा परिसर खचाखच माणसांनी भरलेला, सर्वांनी श्वास रोखून धरलेला, नजरा बैलांच्या धावण्याकडे आणि हा हा म्हणता नांगोळेच्या बैलगाडी शर्यतीच्या मैदानावर सुलतान आणि राम्या या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावून देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीवर आपली मोहर उमटवली. आणि मगच बैलगाडी शर्यतशौकिनांनी रोखून धरलेला आपला श्वास सोडला.
नांगोळे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केरारी राज्यरतरीय भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीचे प्रथम क्रमांकाचे पाच लाख ५५ हजार ५५५ रुपये व पारितोषिक पिंपळवाडी येथील रमेश खोत यांच्या किंगमेकर सुलतान व राम्या या बैल जोडीने पटकावला आहे. यावेळी हजारो शौकिनांनी शर्यतीचा थरार अनुभवला.
द्वितीय क्रमांकाचे ३ लाख ५ हजार ५५५ रुपये व पारितोषिक प्रकाश देवकते यांच्या तांबड हारण्या शरद माने करंजे यांच्या गज्या या बैल जोडीने पटकावले आहे. तृतीय क्रमांकाचे बक्षीस २ लाख ५ हजार ५५५ रुपये व पारितोषिक नामदेव जानकर यांच्या गुलब्या व राजदीप थोरात यांच्या कॅडबरी या बैल जोडीने पटकावले आहे.
ब गटाच्या निकालामध्ये प्रथम क्रमांक बाबर शेठ यांच्या बैल जोडीने तर द्वितीय क्रमांक संतोष पांढरे यांच्या बैल जोडीने तर तृतीय क्रमांक सागर घागरे यांच्या बैल जोडीने पटकावला. ब गटाच्या दुनया फेरीमध्ये प्रथम क्रमांक बबलू पाटील, द्वितीय सागर पाटील, तृतीय नेताजी शेंडगे यांच्या बैल जोड्यांनी पटकावला. आदत गटामध्ये प्रथम क्रमांक देवा केंगार, द्वितीय यशवंत दडस, तर तृतीय विशाल मिरो यांच्या बैल जोडीने पटकावला.
यावेळी समितदादा कदम, सम्राट महाडिक, गणेश भेगडे, मिलिंद कोरे, अनिल लोंढे, आझम मकानदार, विजय शेजाळ, जयसिंग शेंडगे, तानाजी यमगर, सरपंच छायाताई कोळेकर, दादासाहेब कोळेकर, ईश्वर वनखडे, रणजित घाडगे, उदय भोसले, विक्रम कोळेकर हे उपस्थित होते. भाजपचे नेते संदीप गिले-पाटील, राकेश कोळेकर यांनी आयोजन केले.
राजमाता बैलगाडी शर्यत संघ यांच्या वतीने शर्यतीच्या सर्व नियोजनाची तयारी करण्यात आली होती. हजारो शर्यत प्रेमींच्या उपस्थितीत हा बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला. हजारो बैलगाडा शर्यतशौकीनांनी गर्दी केली होती.
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन करताना या शर्यती मैदानाचे आयोजक संदीप गिड्डे पाटील यांना महाराष्ट्रात काम करण्याची संधी देऊ, असे आश्वासन दिले आणि आश्वासन पाळणारा म्हणून आपल्याकडे पाहिले जाते. संदीप गिल्ले यांनी आगामी सांगली महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मदत करावी, असे आवाहनही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी संदीप गिड्डे पाटील हे भाजपसाठी अहोरात्र काम करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचे निस्सीम प्रेम आहे. पक्षाने त्यांना मोठी जबाबदारी द्यावी अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे पक्ष त्यांना ताकद देईल तसेच तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना सर्व ती मदत करू, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात पक्षाला घवघवीत यश मिळवून देऊ, अशी हमी संदीप गिड्डे पाटील यांनी बोलताना दिली.