For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुखोई लढाऊ विमानांना केले जाणार अपग्रेड

06:38 AM Jul 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुखोई लढाऊ विमानांना केले जाणार अपग्रेड
Advertisement

पुढील 30 वर्षांपर्यंत शत्रूंचा बीमोड करण्यासाठी सज्ज होणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत स्वत:च्या सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमानांना आणखी शक्तिशाली करण्याच्या तयारीत आहे. संरक्षण मंत्रालयाने 84 सुखोई लढाऊ विमानांच्या पहिलया तुकडीला अपग्रेड करण्यासाठी सुमारे 63 हजार कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. या अपग्रेडनंतर ही सुखोई लढाऊ विमाने पुढील 30 वर्षांपर्यंत आकाशात शत्रूंना नष्ट करण्यास सक्षम होणार आहेत. या अपग्रेडमध्ये लढाऊ विमानात अॅडव्हान्स्ड रडार, प्रभावी इलेक्ट्रॉनिक्स, दीर्घ पल्ल्यापर्यंत मारा करणारी अस्त्रs आणि मल्टी सेंजर फ्यूजनसारखी अनेक वैशिष्ट्यो जोडली जाणार आहेत. यानंतर ही सुखोई विमाने पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांना टक्कर देऊ शकतील. हे अपग्रेडेड सुखोई लढाऊ विमान 2055 पर्यंत उ•ाण करत राहणार असल्याचे एका सूत्राकडून सांगण्यात आले.

Advertisement

सध्या भारतीय वायुदलाकडे केवळ 30 लढाऊ स्क्वाड्रन्स आहेत. तर चीन आणि पाकिस्तान दोघांचेही आव्हान पेलण्यासाठी 42 स्क्वाड्रन्सची गरज आहे. प्रत्येक स्क्वाड्रनमध्ये 16-18 लढाऊ विमाने असतात. अशा स्थितीत या सुखोई लढाऊ विमानांना अपग्रेड करणे अत्यंत आवश्यक ठरले आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड पुढील 15 वर्षांमध्ये 84 सुखोई लढाऊ विमानांना अपग्रेड करणर आहे. सीसीएसकडून मंजुरी  मिळाल्यावर याचे डिझाइन आणि विकासाकरता 7 वर्षे लागणार आहेत. यानंतर लढाऊ विमानांना तुकड्यांमध्ये अपग्रेड करत वायुदलात सामील केले जाईल.

भारताच्या ताफ्यात सुखोईचा समावेश

भारताकडे सध्या अनेक सुखोई लढाऊ विमाने आहेत, ही विमाने भारताच्या लढाऊ क्षमतेचा कणा आहेत. यातील बहुतांश विमाने एचएएलने रशियाकडून परवाता मिळवत निर्माण केली आहेत. याचबरोबर दुर्घटनाग्रस्त झालेल्या लढाऊ विमानाच्या भरपाईसाठी 11,500 कोटी रुपयांच्या निधीतून 12 नवी सुखोई लढाऊ विमाने आणि त्याच्या उपकरणांना खरेदी केले जाईल. पुढील 15 वर्षांमध्ये भारताकडे स्वत:चे पाचव्या पिढीचे लढाऊ विमान एएमसीए (अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट) असेल. याच्या तंत्रज्ञानाचा वापर पहिल्या 84 लढाऊ विमानानंतर अपग्रेड करण्यात येणाऱ्या सुखोई लढाऊ विमानात केला जाणार आहे.

स्वदेशी रडारचा होणार वापर

या अपग्रेडमध्ये सुखोई लढाऊ विमानात स्वदेशी ‘विरुपाक्ष’ एईएसए रडार लावण्यात येईल. सद्यकाळातील रडारच्या तुलनेत 1.5 ते 1.7 पट अधिक अंतरापर्यंत तो शत्रूच्या विमानांचा थांगपत्ता लावू शकणार आहे. याचबरोबर लढाऊ विमानात दीर्घ पल्ल्यापर्यंत मारा करणारे अस्त्र-3 एअर-टू-एअर क्षेपणास्त्र बसविण्यात येईल, जे 350 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत मारा करू शकते. वायुदल सध्या 100 किलोमीटरपर्यंत मारा करू शकणाऱ्या अस्त्र-1 क्षेपणास्त्रांना सामील करत आहे. तर डीआरडीओ 160 किलोमीटरपर्यंत मारा करू शकणारे अस्त्र-2 आणि सॉलिड फ्यूल डक्टेड रॅमजेट प्रणोदनयुक्त अस्त्र-3 क्षेपणास्त्र विकसित करत आहे.

फ्लाय-बाय-वायर सिस्टीम वगळता अपग्रेड करण्यात आलेल्या सुखोई लढाऊ विमानाचे सर्व इलेक्ट्रॉनिक्स स्वदेशी असणार आहे. यात उत्तम अल्गोरिदम असलेली तिन्ही मिशन कॉम्प्युटर  सामील आहेत.  अपग्रेड करण्यात येणाऱ्या 51 सिस्टीम्सपैकी 30 एचएएल, 13 डीआरडीओकडून तर 8 सिस्टीम्स खासगी क्षेत्राकडून निर्माण केल्या जाणार आहेत. सध्या 40 सुखोई विमानांना ब्राह्मोस सुपरसोनिक व्रूज क्षेपणास्त्रs वाहून नेण्याच्या दृष्टीने अपग्रेड करण्यात आले ओ. ब्राह्मोसची मारकक्षमता पूर्वीच 290 वरून वाढवत 450 किलोमीटर करण्यात आली आहे. लवकरच याच्या 800 किलोमीटरच्या वर्जनलाही सामील करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.