कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ब्रिटिश पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत सुकांतला रौप्य तर कृष्णाला कांस्य पदक

06:39 AM Jul 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

Advertisement

भारताच्या पॅरा बॅडमिंटन स्टार्सनी ब्रिटिश आणि आयर्लंड पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली. भारतासाठी पदक मिळविणाऱ्यांत सुकांत कदम आणि कृष्णा नागर होते, ज्यांनी त्यांच्या श्रेणींमध्ये अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले, आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च दर्जाचे कौशल्य आणि दृढनिश्चय दाखवला. भारताने एकूण 21 पदके पटकविली आहेत.

Advertisement

पुरुष एकेरी एसएल-4 प्रकारात, जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सुकांत कदमने अंतिम फेरी गाठताना त्याने उपांत्य फेरीत सहकारी भारतीय नवीन शिवकुमारचा सरळ सेटमध्ये (21-14, 21-19) पराभव केला. अंतिम फेरीत, सुकांतने फ्रान्सच्या पॅरालिम्पिक चॅम्पियन लुकास माझुरशी सामना केला आणि झुंजार लढत दिली. पण त्याला 6-21, 14-21 असा पराभव स्वीकारावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले,

पुरुष एकेरी एसएच-6 प्रकारात, पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कृष्णा नागरने आपला सातत्यपूर्ण फॉर्म सुरू ठेवला. उपांत्य फेरीत पोहोचण्यापूर्वी त्याने कठीण संघर्षपूर्ण कांस्यपदक जिंकले. येथील प्रत्येक सामना एकाग्रता आणि सहनशक्तीची परीक्षा होती. मला पुन्हा एकदा पोडियमवर पोहोचण्याचा आनंद आहे आणि पॅरिसकडे जाताना या कामगिरीमुळे मला खूप आत्मविश्वास मिळतो, असे कृष्णा नगर म्हणाला.

या स्पर्धेतील इतर भारतीय पदक विजेते : पुरुष दुहेरा डब्लूएच 1-डब्लूएच 2 मध्ये प्रेम कुमार आले / अबू हुबैदा यांना कांस्यपदक, एसएच 6 मिश्र दुहेरीमध्ये कृष्णा नगर / निथ्या,कांस्यपदक, एसयू 5 मध्ये महिला एकेरीमध्ये सुवर्ण मनीषा रामदास, एसएल 3 महिलामध्ये रौप्य मनदीप कौर, मिश्र दुहेरी एसएल 3 -एसयू 5 मध्ये कांस्य मनदीप कौर / चिराग बरेथामध्ये कांस्य पदक.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article