कर्नाटक रणजी संघात बेळगावचा सुजय सातेरी
10:31 AM Jan 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बीसीसीआय रणजी चषक क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटक संघाची 16 खेळाडूंची संभाव्य यादी जाहीर झाली असून बेळगावच्या सुजय संजय सातेरी यांची वर्णी लागली आहे. सोमवारी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत खालील यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये मयांक अगरवाल (कर्णधार), श्रेयश गोपाल (उपकर्णधार), देवदत्त पडीकल, अनिश के.व्ही., समरन आर., श्रीजित के.एल. व सुजय सातेरी-यष्टीरक्षक, अभिनव मनोहर, हार्दीक राज, प्रसिद्ध कृष्णा, कौशिक व्ही., अभिलाश शेट्टी, पी. यशोवर्धन, निकीन जोश, विद्याधर पाटील, मौनिक खान आदी खेळाडूंचा समावेश आहे. संघाचे प्रशिक्षक म्हणून इरागौडा के., गोलंदाज कोच मन्सूरअली खान, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक शबरेश मोहन, संघ व्यवस्थापक आर. रमेशराव, फिजीओ थेरपिस्ट जाबा प्रभू, स्ट्रेंथ अॅण्ड कंडिक्शिंग कोच गिरीप्रसाद यांचा समावेश आहे.
Advertisement
Advertisement