महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वास्कोत युवतीची आत्महत्या

12:05 PM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वास्को : वास्कोतील एका युवतीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मयत युवतीचे नाव तक्शीना सरकाजी (28) असे असून ती नवेवाडेतील राहणारी आहे. मयत युवती वास्कोतील एका खासगी शाळेत इंग्रजी विषयाची शिक्षीका होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी संध्याकाळी उघडकीस आली. मयत युवती रविवारी दुपारी आपल्या खोलीत झोपायला गेली होती. ती संध्याकाळ झाली तरी खोलीतून बाहेर येत नसल्याने तीच्या आईने दरवाजा ठोठावून पाहिले. परंतु आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घाबरलेल्या आईने आपल्या नातेवाईकांना व शेजाऱ्यांना सांगितले. त्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून तीच्या खोलीत प्रवेश केला असता सिलिंग फॅन व दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत ती आढळून आली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवचिकित्सेसाठी पाठवून दिला. सोमवारी दुपारी तीचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. मयत युवती वास्कोतील एका खासगी शाळेत शिक्षिका होती. तीने आत्महत्या करण्यासारखी पाऊल का उचलले याचा उलगडा झालेला नाही. पोलीस उपनिरीक्षक रोहन नागेशकर या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article