For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

कोडोलीत कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या; पतीस अटक

01:10 PM Jan 12, 2024 IST | Abhijeet Khandekar
कोडोलीत कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या  पतीस अटक
Suicide married woman

वारणानगर / प्रतिनिधी

कोडोली ता. पन्हाळा येथील शामूनाना नगर मधील शुभांगी संतोष कुंभार (वय २४) या विवाहितेने घरगुती वादातून राहत्या घरी छताच्या हुकास ओढणीने गळफास लावून बुधवार दि. १० रोजी सकाळी आत्महत्या केली. याबाबत रात्री उशिरा कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पतीस अटक केली आहे.

Advertisement

पती संतोषच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याने मृतदेहाची उत्तरीय तपासणी न करण्याचा माहेरच्या लोकांनी पोलीसांकडे आग्रह धरल्याने पती संतोष बाबासो कुंभार (वय ३०) यास अटक केली आहे.

वारनूळ, ता. पन्हाळा येथील विष्णू कुंभार यांची मुलगी शुभांगी हिचा विवाह संतोष कुंभार याच्याशी चार वर्षांपूर्वी झाला होता. संतोष मूळचा कोरेगाव (ता. वाळवा) येथील आहे. कामानिमित्त तो कोडोली येथे २० वर्षांपासून राहत आहे. वाहन खरेदीसाठी माहेरहून ५० हजार रुपये आणावे, म्हणून पती संतोष तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. याला कंटाळून आपल्या मुलगीने आत्महत्या केल्याची तक्रार वडील विष्णू कुंभार यांनी कोडोली पोलीसांत दिली. शुभांगी हिला अडीच वर्षांचा मुलगा आहे. अधिक तपास स.पो.नि. शीतलकुमार डोईजड करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.