कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेतकऱ्याची कमाल! रसवंतीच्या ऊसशेतीमुळे लखपती, एकरी 50 टनाचे उत्पन्न

04:49 PM Apr 25, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

देसाई कुटुंबाचा प्रयोगशील उपक्रम, उसाचे व्यापारीकरण केले तर ७ ते ८ हजार रुपयेपर्यंत दर 

Advertisement

By : महादेव पाटील 

Advertisement

सांगली (कुरळप) : ऊस व साखरेच्या बाबतीत केंद्र सरकारचे बदलणारे धोरण आणि त्यानंतर कारखानदारांचा बदलणारा पवित्रा या दृष्टचक्रात ऊस उत्पादक शेतकरी चिरडून व पिळून निघाला आहे. दाहीदिशा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. शेती करावी की सोडावी, ऊस पिकवावा की सोडून द्यावा, अशा मानसिकतेत असणाऱ्या शेतकऱ्याला रसवंतीच्या माध्यमातून ऊसदराचे आशेचे किरण दिसू लागले आहे. रसवंती करून उसाचे व्यापारीकरण केले तर उसाला ७ ते ८ हजार रुपयेपर्यंत दर मिळू शकतो असा विश्वास करंजवडे येथील देसाई कुटुंबाला झाला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या शेतात रसवंतीचा ऊस लावला आहे.

करंजवडे येथील निवृत्त गटशिक्षणाधिकारी शिवाजी कलाप्पा देसाई व त्यांच्या बीएससी ॲग्री असलेल्या मुलाकडून हा प्रयोगशील उपक्रम केला आहे. त्यांनी त्यांच्या शेतातील २७ गुंठे क्षेत्रामध्ये १६ जुलै २०२४ रोजी ९२००५ या उसाच्या जातीची लागवड केली आहे. ही उसाची जात पांढरट रंगाची असून वाढीला व उंचीला चांगली आहे. शिवाय या उसाच्या जातीचा उत्पादन खर्च इतर बियाण्यांच्या तुलनेत कमी राहतो. या उसाच्या वाढीचा वेग सुद्धा इतर जातीच्या बियाणांच्या तुलनेत कमी वेळेत चांगली वाढ असा आहे.

एकंदरीत ९२००५ जातीचा ऊस वजनाला चांगला असून त्यातून उत्पन्न चांगले मिळते. शिवाजी देसाई यांनी त्यांच्या शेतात लावलेल्या ऊस रसवंती या उद्देशाने लावलेला आहे. रसवंतीला जवळपास दहा महिन्याचा ऊस परिपक्व झालेला योग्य ठरतो. दहा महिने वय असणाऱ्या उसातील रिकव्हरी म्हणजेच उसाच्या रसाचे प्रमाण सुद्धा जास्त आणि उत्कृष्ट नमुन्याचे राहते. शक्यतो सर्वत्र रसवंतीसाठी वापरला जाणारा ऊस हा नऊ ते दहा महिन्याच्या पुढील असतो. शिवाजी देसाई यांनी लावलेल्या या उसाचे वय येणाऱ्या १५ मे रोजी दहा महिन्यांचे होत आहे.

करंजवडेसह परिसर हा ऊसबागायत क्षेत्र आहे. राजारामबापू व वारणा साखर कारखान्याचे अधिकृत कार्यक्षेत्र असणाऱ्या या ठिकाणी लिफ्ट इरिगेशन संस्था कार्यरत आहेत. याशिवाय अनेक शेतकयांनी स्वत:च्या बिहिरी खुदाई केल्या आहेत. बारमाही वाहणारी वारणा नदी असल्याने परिसरात पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी बारमाही बागायती पिके घेत आहेत. उसासारखे पीक या ठिकाणी जवळपास शंभर टक्के घेतले जाते.

केंद्र सरकारचे धोरण.....

साखर उद्योगावर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. त्यामुळे साखर उद्योगाबाबत असणारे सर्व धोरणे, नियम, कायदे केंद्राच्या माध्यमातून ठरवली जातात. गेल्या पाच ते दहा वर्षापासून साखर उद्योगाबाबत केंद्र सरकारकडून घेतली जाणारी धोरणे उद्योगाला अडचणीची ठरत आहेत. असे साखर कारखानदारांच्या कडून सांगितले जात आहे. साहजिकच याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्याला दिल्या जाणाऱ्या दारावर होतो आहे. याचेही स्पष्टीकरण साखर कारखानदार देत आहेत. केंद्र सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या बाजूने राहिल्यास चांगला दर देता येईल, अशी अपेक्षा साखर कारखानदार व्यक्त करतांना दिसून येत आहेत..

कारखान्याला ऊस देणे परवडत...

उसाच्या दराबाबत अनिश्चितता आहे. उसाची लागण केल्यापासून ऊसाला किती दर मिळेल हे मुळात शेतकऱ्याला माहीत नसते. त्यामुळे शेतकयाचे उसाबाबतचे अर्थशास्त्र कोलमडलेले राहिले आहे. उत्पादन खर्च वाढीव स्वरूपाचा असल्याने उसाचे उत्पादन घेण्यामध्ये शेतकरी आता कचरत असल्याचे चित्र आहे. एकंदरीत उत्पादन खर्चा एवढा सुद्धा उसाचा दर कारखान्यांकडून मिळत नाही. अशी तक्रार शेतकरी अनेक वर्षांपासून करत आहे.

एकरी ४० ते ५० टन....

चांगल्या उत्तम प्रकारचे नियोजन केले, चांगल्या बियाणाची निवड केली, त्याची लागण प्रक्रिया शास्त्रोक्त व आधुनिक पद्धतीने केली तर उसाचे एकरी उत्पादन ५० टनापर्यंत सहज मिळू शकते. दहा महिने वय असणारा ऊस रसवंतीला दिल्यास त्याच्यामध्ये रस तयार झालेला असतो व तो पक्व सुद्धा असतो. रसवंतीला ऊस गाळपासाठी दिल्यास निश्चित प्रकारे शेतकयांना ७ ते ८ हजार रुपये पर्यंत दर मिळू शकतो. यातून संबंधित शेतकऱ्याला चार लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न मिळू शकते. रसवंतीला ऊस गाळपास देणे हा शेतकऱ्यांना चांगला आर्थिक पर्याय आहे.

त्रिवेणी संगम विस्कटलेल्या स्वरूपात...

"सरकारी धोरण, साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक हा त्रिवेणी संगम गेल्या अनेक वर्षापासून विस्कटलेल्या स्वरूपात आहे. एकतर शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाकरिता मजबूत नियोजनाची आवश्यकता आहे. परंतु शेतकऱ्याच्या संदर्भात अशा कोणत्याही गोष्टी आजपर्यंत झालेल्या दिसून येत नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्याला स्वत:च शेतीचे व्यापारीकरण करायला पाहिजे आहे. शेतात असे पीक घ्या की जे आपल्याला व्यापारी पद्धतीने विकता येईल. उसापासून रस तयार करणे व तो विकणे हा व्यवसाय फायद्याचा आहे. आर्थिकदृष्ट्या सुलभता निर्माण करणारा आहे. त्यामुळे युवकांनी रसवंतीला प्राधान्यक्रम दिला पाहिजे."

Advertisement
Tags :
# Sugarcane farmers#sangali#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaSangli farmerssugercane
Next Article