For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेर्णातील ड्युरालाईन्सकडून 46 कर्मचारी बडतर्फ

01:01 PM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
वेर्णातील ड्युरालाईन्सकडून 46 कर्मचारी बडतर्फ
Advertisement

आझाद मैदानावर निदर्शने, पूर्वसूचना न देता अचानक बडतर्फ केल्याने कंपनीच्या कृत्याचा निषेध 

Advertisement

पणजी : वेर्णा औद्योगिक वसाहतीतील ड्युरालाईन या डक्ट केबलचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने आपल्या सुमारे 46 कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बडतर्फ केले असून त्याचा निषेध म्हणून मंगळवारी त्या कर्मचाऱ्यांनी पणजीत आझाद मैदानावर जोरदार निदर्शने केली. आयटक कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली हे सर्व कर्मचारी सकाळी आझाद मैदानावर एकत्र आले व प्रसन्न उटगी आणि राजू मंगेशकर या कामगार नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तेथे निदर्शने केली. सर्व कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे ही एकमेव मागणी त्यांनी केली असून हा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आंदोलन सुऊच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

गत सुमारे 30 वर्षांपासून गोव्यात कार्यरत असलेली ड्युरालाईन ही अमेरिकन कंपनी असून बडतर्फ करण्यात आलेल्या काही कामगारांमध्ये 30 ते 27 वर्षेपर्यंत तेथेच सेवा देणाऱ्यांचाही समावेश आहे. अशा या कामगारांना गत दि. 1 एप्रिलपासून कोणतीही कल्पना न देताच बडतर्फ करण्यात आले आहे. दि. 31 मार्च रोजी मध्यरात्री या कामगारांना मोबाईलवर मॅसेज पाठवून उद्यापासून कामावर येऊ नये, असे कळविण्यात आले होते. तसेच त्यांची सेटलमेंटची सर्व रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आल्याचेही सदर मॅसेजमधून कळविण्यात आले होते, अशी माहिती कामगार नेते श्री. मंगेशकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सदर मॅसेज मिळाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी सर्व कामगार कंपनीत येण्यासाठी आले असता गेटला कुलूप लावून त्यांना प्रवेश रोखण्यात आला. त्या दिवसापासून या कामगारांनी कंपनीच्या गेटबाहेर आंदोलन सुरू केले आहे. कंपनीची सदर कृती बेकायदेशीर असल्याने कामगारांनी मडगाव येथे कामगार उपायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. परंतु तक्रार करूनही न्याय मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दि. 18 जून क्रांतिदिनापासून त्यांनी पणजीत आझाद मैदानावर ठाण मांडले आहे.

Advertisement

कंपनीचा निर्णय अन्यायकारक : उटगी

दरम्यान,एका बाजूने राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण वाढत असतानाच एखाद्या कंपनीने आपल्या कायमस्वरूपी कामगारांना अचानक बडतर्फ करणे हा मोठा अन्याय असून सहन करण्यापलीकडे आहे. सरकारने कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून या कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी श्री. उटगी यांनी केली. अन्यथा हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.