For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुचित्रा कृष्णमूर्तीची मुलगी करणार पदार्पण

07:00 AM Dec 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
सुचित्रा कृष्णमूर्तीची मुलगी करणार पदार्पण
Advertisement

कावेरी ठेवणार अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल

Advertisement

शेखर कपूर आणि सुचित्रा कृष्णमूर्ती यांची कन्या कावेरी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. एका मोठ्या प्रॉडक्शन हाउसच्या बॅनर अंतर्गत कावेरी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. कावेरी उत्तम गायिका असून अभिनयाचे धडे सध्या गिरवत आहे. कावेरी बोस्टनमध्ये बर्कली स्कूल ऑफ म्युझिकमधून प्रशिक्षण मिळवत आहे. कावेरीने यापूर्वीच एक गायिका आणि संगीतकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. चित्रपट निर्माते तिला आता अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी देण्यासाठी उत्सुक आहेत. स्वत:च्या बहारदार पोर्टफोलिओद्वारे कावेरीने एका प्रॉडक्शन हाउसचे लक्ष वेधून घेतले आहे. कावेरी एका भूमिकेसाठी वर्कशॉपमध्ये सहभागी झाली आहे. तिच्या पदार्पणाचा चित्रपट हा बिगबजेटयुक्त असेल. सुचित्रा कृष्णमूर्ती आणि शेखर कपूर हे विभक्त झाले होते. कावेरी यांचे पालनपोषण सुचित्रा यांनीच केले आहे. परंतु कावेरी ही शेखर कपूर यांच्यासोबत भावनिक स्वरुपात जोडली गेलेली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.