महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सूचना सेठला पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी

12:19 PM Jan 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : स्वत:च्या चार वर्षांच्या मुलाच्या खुनाचा आरोप असलेल्या सूचना सेठला पणजी येथील बाल न्यायालयाने काल सोमवारी पाच दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे. सूचना सेठला म्हापसा न्यायालयाने दिलेली सहा दिवसांची कोठडी रविवारी संपली होती. हे प्रकरण बालकाच्या मृत्यूशी निगडीत असल्याने कळंगुट पोलिसांनी तिला सोमवारी दुपारी 12. 30 वाजता पणजीतील बाल न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. बाल न्यायालयात सरकारी वकिलांनी सूचना सेठ ही पोलीस चौकशीला सहकार्य करत नसल्याचा दावा केला. ती मुलाचा खून कसा केला याची त्रोटक माहिती देत असून काही गोष्टी लपवत आहे. तिची सखोल जबानी घेण्यासाठी आणखी अवधी हवा असून तिची डीएनए चाचणीही करायची आहे. याशिवाय इतर पुरावेही गोळा करायचे आहेत. त्यामुळे सूचनाला आणखी आठ दिवस पोलीस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. मात्र न्यायालयाने तिला पाच दिवसांची कोठडी वाढवली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article